रिसोड जवळ इंडिका कारला अपघात, ७ ठार. रिसोड तालुक्यातील भर जहांगीर जवळ भरधाव वेगात असलेल्या इंडिका कारला भीषण अपघात झाला. या मध्ये ७ ठार झाले आहेत. काल रात्री रिसोड कडून भर जहांगीर कडे सदर इंडिका कार येत होती. गावाजवळील एका वळणावर चालकाचा इंडिका कारवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेल्या ७ जणांपैकी ६ जन जागीच ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेले ७ पैकी ५ जण हे लोणार येथील होते. मृत हे सर्व २०-२५ वयोगटातील होते.
मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाला विएतनाम च्या समुद्रात अपघात
संपर्क तुटलेलं मलेशियन एअरलाईन्सचं प्रवासी विमान, व्हीएतनामच्या समुद्रात कोसळलं आहे. व्हीएतनाम माध्यामांनी याबाबतची माहिती दिली आहे. या विमानात 12 कर्मचारी आणि 227 प्रवाशांसह 239 जण होते.
हे विमान क्वालालंपूरहून चीनची राजधानी बिजींगकडे जातं होतं..शुक्रवारी साडेचारला निघालेलं हे विमान रात्री साडेदहापर्यंत चीनमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु विमानाचं उड्डाण झाल्यानंतर दोन तासांनी विमानाचा संपर्क तुटला.
सुरुवातीला विमान व्हीएतनामच्या हवाई हद्दीत असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला.मात्र आता हे विमान व्हीएतनामच्या समुद्रात कोसळल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.