तो गाडीवाला नक्की कोण होता ?

घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खणाणला. तिन्ही सांजेला घरात आली एक मरणाची बातमी… ह्या बातमीने घरी सर्वांच्याच काळजाचा ठोका घेतला. घरातले वातावरण अचानक शांत झाले. नातेवाईकांमधील अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मरणाची बातमी होती ही !! त्यामुळे त्या सोयऱ्याच्या गावाला जायची गडबड सुरु झाली. रात्रीच्या गाडीने निघायचे होते. त्यामध्ये आम्ही फार लहान होतो. आम्हांला घरी सोडूनही कसे जावे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत घेऊनही कसे जावे ? हाच प्रश्न बाबांना पडला होता. एकवेळ बाबा म्हणालेही, तुम्ही भावंडे घरीच राहा, आम्ही जाऊन उद्या परत येतो. पण आपल्या वासरांना एकटे सोडून निघेल ती माय कसली. तिने हट्टच धरला ! त्यांना एकटे सोडून जायचे नाही, आपल्या सोबतच घ्यायचे. मग अशा वेळेला नाही म्हणणे तरी कुठे जमणार होते. म्हणून त्यांनाही लगेच होकार दिला आणि आवरून निघालोच आम्ही गावी जायला.

रात्रीची एकच ट्रेन होती आम्हांला त्या गावी जाण्यासाठी, तिनेच लवकर पोहोचू या विचाराने ती ट्रेन पकडली. कारण मरते वेळी आपण तिथं नव्हतो निदान मयतीला (मयत विधीला) तरी हजर पाहिजेच, ह्याच विचाराने बाबांची घाई सुरू होती. रात्रीचा प्रवास, कडाक्याची थंडी आणि झोपेची घाई, सर्व काही एकदमच. पण प्रसंग आणि ओढच अशी होती की, काही केल्या पोहोचायचेच होते लवकर. ते गावही तसे फार दूरच होते आणि ट्रेनने जायचे तर एका दुसऱ्या स्टेशनला उतरून पुढे मिळेल त्या गाडीने प्रवास करायचा होता.

रात्री अंदाजे २ वाजता आम्ही त्या स्टेशनवर उतरलो . सर्वत्र अंधार पसरलेला. स्टेशनही असे सामसूम होते. बराच वेळ स्टेशनच्या बाहेर थांबलो, पण चिटपाखरूही दिसत नव्हते. पुढे जाण्यासाठी एखादी गाडी येते का ? याची आम्ही वाट पाहत होतो. तितक्यात एक ट्रक समोरून आला. थोडं बरं वाटलं, चला जास्त वाट पहावी लागली नाही. पण जसं ठरवलं तसं न होणेच, असेच काही आज नशिबी होते. बाबांनी ट्रक वाल्याला थांबवले, त्याला सांगितले की आम्हांला अमुक-तमुक गावी जायचे आहे, पण तो म्हणाला, “”म्या तर दुसरीकडं चाललोया बघा, पण तुम्हांसनी त्या फाट्यावर सोडितो. बघा जमतंय का. तिथून गाव फार लांब नाय. तिथून कोणचंही वाहन (गाडी) भेटलं तुमासनी”

एवढ्या रात्री दुसरी गाडी मिळणेही अशक्य होते म्हणून त्या ट्रकने जायचे बाबांनी ठरवले आणि आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर कापताच त्या ड्रायवर ने सांगितल्या फाट्यावर येऊन पोहोचलो. आम्हांला तिथे उतरवून तो ट्रक त्याच्या मार्गी लागला. फाट्यावर सर्वदूर अंधार पसरलेला. ज्या दिशेला जायचे होते, त्या दिशेच्या रस्त्याच्या कडेला आम्ही थांबलो होतो. पुढे जाण्यासाठी काही गाडी येते का याची वाट पाहत. पण दूर दूरवर कुठलीही गाडी येताना दिसत नव्हती. फार अंधार होता म्हणून साहजिकच आईला अगदी खेटून आम्ही उभे होतो आणि ह्या अंधारात आम्ही घाबरू नये ह्याची ती देखील काळजी घेत होती. तितक्यात जणू दोन काळ्या सावल्या आमच्या पुढ्यातून समोरच्या झाडीत शिरल्याचे जाणवले. आई-बाबा, आम्ही सर्वांनी ते दृश्य पाहिले, अगदी छातीत धडकीच भरली. काय होते ते ? कोण गेले तिकडे ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात. पण आईचा माझ्या हातावरच्या घट्ट झालेला हात पाहून, नक्कीच ते काहीतरी विचित्र होते हे मला कळून चुकले. त्यात तीही पूर्ण घाबरली होती हे ही मला समजले.

त्यावेळेस माझे वय इतके होते की, भुतं तर दूरच पण नुसता अंधार जरी म्हंटला तरी चड्डी ओली व्हायची. त्यातच पहिल्यांदा असे काही पाहिले, जे खरोखर भयानक होते. कारण आम्ही सोडून तिथे कोणीही दुसरे नव्हते आणि अचानक त्या दोन सावल्या आमच्या समोरून त्या गर्द झाडीत शिरल्या.बाबांनी देखील सावध पवित्र घेतला होता. हे होत नाही तर तर लगेच आमच्या मागे कुणीतरी दोनदा टाळ्या वाजवल्याचा आवाज आम्हांला आला आणि हा नक्कीच भास नव्हता. आता तर आमची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. कारण घडलेल्या घटना नक्कीच साधारण नव्हत्या, पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत… पुन्हा आमच्या समोरच्या झाडीत, पण थोड्या दूरवर आम्हाला त्या दोन काळ्या सावल्या धावताना दिसल्या. मी तर एवढा घाबरलो की तिथेच आई-आई ओरडत तिला घट्ट पकडू लागलो. आम्हांला सावरण्यासाठी लगेच बाबा म्हणाले, ” एखादं कुत्रं बित्रं असलं तिकडं दुसरं कुणी नाहीये तिकडं”.

बाबा आमचे लक्ष्य वळवीत होते, हे आम्हांला कळून चुकले होते. तितक्यात पुन्हा तोच टाळ्यांचा आवाज आणि ह्यावेळेस आमच्या कानाच्या फारच जवळ. आम्ही सारेच दचकलो. आईने लगेच देवाचा धावा केला आणि जोरजोरात मोठ्या आवाजात देवांचे नाव घेऊ लागली. कारण आमच्या बरोबर जे घडत होते, ते नक्कीच काहीतरी विपरीत होते. पुढ्याच क्षणाला त्या दोन काळ्या आकृत्या दूरवरून कसले तरी हातवारे करत आमच्या दिशेने चालत यायला लागल्या. आतातर बाबांचेही भान हरपले होते. तेही अगदी आम्हांला येऊन खेटून उभे राहिले. कर्रर्रर्रर्रर्रर्रर…. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र….. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. आवाज कानी ऐकू येऊ लागला आणि मधेच पुन्हा तो टाळ्यांचा आवाज. आवाज, टाळ्या, सावल्या…. आवाज, टाळ्या, सावल्या… आवाज, टाळ्या, सावल्या…. त्या सामसूम ठिकाणी, अंधाऱ्या रात्री कुठला खेळला जात होता हेच कळत नव्हते आणि ह्यावर करायचे तरी काय ? हाच प्रश्न आम्हां सर्वांना पडला होता. त्या काळ्या आकृत्या आमच्याच दिशेने येत होत्या. इकडे आईचे देवाचे नामस्मरण चालूच होते. ती जोरजोरात देवाचा धावा करू लागली.

तितक्यात जोरजोरात हॉर्न वाजवत एक अँबेसिडर आम्हांला आमच्या दिशेला येताना दिसली. दूरवरून तिची दिसणारी हेड लाईट हा आशेचा किरण म्हणावा की निराशेचा, हे काहीच कळत नव्हते. कारण रात्रीच्या वेळेस जिथे अगदी सुमसाम मोकळा रस्ता आहे, त्या ठिकाणी ही व्यक्ती जोर जोरात हॉर्न वाजवत का येत होती ? आम्ही लगेच रस्त्याच्या कडेने त्या गाडीला हात करू लागलो. ती गाडी आली आणि नेमकी आमच्या समोर येऊन थांबली. एक पांढरी शुभ्र कार, त्या अंधाऱ्या रात्रीत मस्त चमकत होती. बाबा लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला ला अमुक-तमुक गावी जायचे आहे असे सांगितले. पण तेही काही विचित्रच होते. एक पांढरी शुभ्र कार, जोरजोरात हॉर्न वाजवत अचानक आमच्या पुढ्यात येऊन थांबते. त्या गाडीच्या वाहन चालकाचा पेहराव म्हणावा तर, अगदी पांढरे कपडे घातलेली जणू काही मोठी आसामीच होती. अगदी गोरापान, सरळ उभं नाक असलेला असं त्याचं वर्णन होतं. साधारणतः गावी सगळेच पांढरा पोशाख घालतात, पण ह्या महाशयांचा पेहराव काही वेगळाच होता. त्याने जरूर आमच्या समोर गाडी थांबवली, पण त्याने मान वळवून आमच्याकडे एकदाही पाहिले नाही. तो एकटक सरळच पाहत होता, त्याच दिशेला ज्या दिशेने त्या काळ्या सावल्या आमच्याकडे येत होत्या. बाबा पुढे सरसावले त्यांनी त्याला सांगितले की, आम्हांला त्या-त्या गावी जायचे आहे, त्यावर तो लगेच म्हणाला, “”मला माहित आहे तुम्हांला कुठे जायचंय ते, बसा लवकर गाडीत”.

पण एवढेही बोलताना देखील त्याने बाबांकडे काही पाहिले नाही. आम्ही लगेच गाडीत शिरलो. पण बसता – बसता आईने आणि मी मागे वळून पाहिले, तर चमत्कार असा की त्या दिसणाऱ्या सावल्या, आकृत्या जणू कुठेतरी नाहीशा झाल्या होत्या. बाबा बऱ्याच गोष्टी काढत त्या व्यक्ती सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती व्यक्ती काही केल्या बोलायचं नावं घेत नव्हती. एकदाही मान वळवून बाबांकडे अथवा आमच्याकडे पाहत नव्हती. माघे बसलेली आई आणि मी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही आवभाव नव्हते. तो फक्त पुढे बघत गाडी चालवत होता. बराच बोलायचा एकांगी प्रयत्न केल्यानंतर, आता बाबा शांत झाले होते. पण त्या गोष्टीने आमची धाकधूक फारच वाढली होती. पुढे आमचे काय होणार, हे त्या ईश्वरालाच ठाऊक होते आणि त्याचाच धावा आई सतत करत होती. ह्या सर्व घटनेत सकाळचे ५ केव्हा वाजले कळले नाही. काळरात्र बाजूला सारत पहाटेचा प्रकाश तिची जागा घेऊ लागला आणि आम्ही शेवटी त्या गावी पोहोचलो. जसे पोहोचलो तसे पटकन आम्ही सारे गाडीच्या खाली उतरलो. बाबांनी त्या व्यक्तीला पैसे देऊ केले, पण ते न स्वीकारता आणि बाबांकडे न बघता, फक्त हात नकारार्थी हात हलवत तो व्यक्ती गाडी पुढे घेऊन निघून गेला.आम्ही सुखावलो होतो, कारण सरतेशेवटी सुखरूप आम्ही त्या गावाच्या स्टँडवर पोहोचलो होतो. पण एक प्रश्न मात्र, आमच्या सर्वांच्या मनात तसाच अनुत्तरित राहिला… हा गाडीवाला नक्की होता कोण ?

दानवीय असुरी शक्ती झाली नतमस्तक

वेशीवरच भूत अंतिम भाग
गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. तरी तिथे दानवीय शक्ती वावरत होती आणि सर्व लोक त्या अमानवीय शक्ती चा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे.

तसे विराट बोलला कोण हाये बे तो धिप्पाड पोऱ्या अन तुले कसा काय वयखते ? किशोर म्हणे अबे मले काय माहित कोण हाये तर मले त आज या भूतायन मांगचा जनम भी सांगितला की मले दोन भाऊ होते अन मोठा भाऊ राज्या होता अन लहाना भाऊ बिघडेल होता पण मले थोडी आठवते मांगचा जनम अशीन भी.. नशीन भी. नाहीतन हे भूत खोट बोलत असतीन आपल्याले फिरवत असतीन यायची प्रवृत्तीच आहे ती. तिकडे भूत आणि त्यांचे राक्षस कोणी आकाशी पाळण्यात तर कोणी कुठ जाऊन बसले. आणि युद्धाची तयरी करू लागले. महादू बुआ बोलले काय होवून रायले हे सायाचे काहीच समजून नाई रायल मले…. माय त डोक्स बंद बधीर झाल लेक हो. मांगच्या जन्मी काय पाप केलत की हा दिवस पाह्याले भेटला…!!
सुन्या बोलला आपल्या सगळ्यांची पळता भुई थोडी झालेली आहे……टांगा पलटी अन घोडे फरार अशी अवस्था त्यात आपुन सगळ्यांन जगण्याची आशा सोडलेली. सर्वांना कळून चुकले आज की आज आपली विकेट पडणार कुणाची आधी त कुणाची नंतर… पण नक्कीच पडणार रे भो.. जीव जाते आज आपला.
जाक्र्या म्हणे मले फकत अठीसाक तो पोऱ्या लय पटला…. वीराट्या बोलला कोनसा बे तोच धिप्पाड पोऱ्या…..किशऱ्याले कसा म्हणे मेरे यार….. मेरे भाई…. मेरे दोस्त अन गपागप बाटलीत भूत कोंबे.
तेवढ्यात सगळ्याचं हसण बंद झाल जनाबुढाच्या डोकश्यात भरभक्कम काही तरी त्या आग्या न फेकून हाणल अन बुडा पडला खाली. तसे सर्व ओरडायला लागले. बुडा रगत ओकू लागला. त्याले वाचवणार तितक्यात जाक्र्याच्या कानाखाली कोणी मारली अन जाक्र्या बेशुद्ध पडला. सगळे सैरा वैरा पळू लागले. आणि महादू बुआ पळत असताना एका भुताने बुआ चा पाय पकडला अन फेकल बुआले बुआ पडला कुपात जाऊन. साऱ्या अंगात काटे घुसले. सोपान्याच्या पायाचे लचके कोल्हे तोडत होती… महाभयंकर तो आवाज आणि सगळे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात. रात्रीचे अडीच वाजले असावेत असे मन्या बोलला. आज आपण वाचणार की नाही हे तर माहित नाही पण इकडे तिकडे पळाल्या पेक्षा यांच्याशी दोन-दोन हात करूनच मरू. किशऱ्या म्हणे बरोबर आहे मन्याचे हि वेळ इकडे तिकडे पळायची नाही हि वेळ आहे एकत्र येण्याची आणि गुरुमंत्राचा जप करण्याची किशऱ्याने सर्वांना एकत्रित केले आणि सर्व एकाजागी बसून नामजप करत होते तेव्हा त्यांना कळल की असे केले की आपल्याला कुणी मारत नाही. आणि ते तेच करू लागले. आणि होत असलेल्या वेदना सहन करू लागले.
आणि त्यांची प्रतीक्षा संपली तिथे दत्ताआबा पोहचले.
त्यांनी सर्वात आधी गावकऱ्याना सांगितले की मी जसे सांगतो तसे करा. इथे मोठमोठी राक्षस, असुर, दैत्य, दानव उपस्थित आहेत. त्यामुळे थोडीशी चूक सर्वांचा अंत करु शकते. आबांनी सर्वांच्या बाजूला एक रिंगण आखले व सर्वांना सांगितले की या रिंगणाच्या बाहेर कोणी निघणार नाही. आणि सर्व लोक त्यात बसलीत आणि दत्ताआबा रिंगणाच्या बाहेर उभे राहून त्या धिप्पाड पोराला व दाढी वाल्या बुआ ला काहीतरी सांगत होते हे तीघ तिथे उभे राहून यांनी त्या राक्षसराजला चुनोती दिली आणि आबा ने शंख वाजवला तसे राक्षसांनी सुद्धा किंचाळायला सुरुवात केली आणि यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले ते एकमेकांवर वार करू लागलेत राक्षस चमकणारे गोळे फेकत होता तसे आबा त्यावर भस्म फेकत होते. असे हे खूप वेळ चालले… तिकडे धिप्पाड पोरगा भूत बाटलीत कोंबे…दाढी वाला बुआ त्या चूडेल, डाकिन. आग्या, वेताळ यांच्यावर धावून जाये. किशऱ्याला व बाकी रिंगणात बसलेल्याना काम दिल होत की गोवऱ्या जाळायच्या व सर्वत्र धूर करायचा. त्यात थोडे जडीबुटीची पावडर टाकायची. सर्व धूर करण्यात व बघण्यात मग्न होते सर्वांना छोटे छोटे कापडांचे तुकडे दिले होते ते सर्वांनी मनगटावर बांधले व सर्वांनी जोरजोरात ईश्वराचा नामघोष सुरु केला सर्व भूत प्रजाती हतबल झाल्या…. सर्व दत्ताआबाला विनवणी करू लागल्या की आम्ही परत अशे शक्तीचे प्रदर्शन करणार नाही. खोट-नाट बोलून लोकांना फसवणार नाही आणि आजच्या सारखे कुणाला कधीच त्रास देणार नाही. आम्ही शरण येतो आम्हाला क्षमा करा. तुमची शक्ती आमच्या पेक्षा महान आहे आम्हाला जाऊ द्या आम्ही परत गावावर आमची छाया पडू देणार नाही. आम्ही जंगलातच भटकत जाऊ. आम्ही जेवढ्या लोकांना त्रास दिला पछाडल त्यांना सोडून देतो. पण आम्हाला आमची हि सजा पूर्ण करू द्या. नाहीतर विधाता रागवेल. शेवटी आबा बोलले की या वेशीवरच्या भूतामुळे आमचा सर्वांचा लाडका दिप्या गेला त्यामुळे मी या भुताला क्षमा नाही करू शकत आणि आबाने वेशीवरच्या भुताला नष्ट केल. किशाऱ्या व सर्व दिप्या गेल्यामुळे शोक करू लागलीत व सर्व स्वताला दोष देऊ लागली…आबा बोलले पोर हो तुमच्या क्षणिक सुखाच्या नादात तुमच्या व्यसना पाईच आज दिप्या गेला. पण दिप्या काही काळानंतर परत येईल जनम घेऊन. राक्षसराज ला सुद्धा पश्चाताप होत होता. आबा बोलले की राक्षसराज तुम्हाला खरोखर तुमची चूक मान्य झालेली दिसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा अधर्माने कितीही पायमूळ पसरली तरी धर्माला ती परास्त करू शकत नाही. असत्य कितीही हुशारीने बोला ते सत्य लपवू शकत नाही. आबा लोकांना उद्देशून बोलले की लोकहो क्षणिक सुख शेवटी क्षणिकच असते. ते परम शांती कधीच देऊ शकत नाही.
किशोर बोलू लागला त्याने आबाचे पाय पकडले व क्षमा मागू लागला आणि बोलला मी आज तुम्हाला व सर्वांना साक्षी मानून शपथ घेतो की आजच्या नंतर कोणत्याच गलत गोष्टीत मन ठेवणार नाई. अन आबा जे सांगतात तेच करत जाईन. व किशोर ने शपथ घेतली. आबाला त्यांची नम्रता पाहून चांगले वाटले व आबाने किशोरला सांगितले की बाळ किशोर रडू नकोस शोक आवर स्वताचा एक दिवस हा दिप्या परत येईल दुसऱ्या कुठे तरी जनम घेऊन…आणि तुला तो परत मिळेल. तेव्हा त्याचा खूप लाड कर…आणि आज जे घडले असे कधी कुणासोबत घडणार नाही यावर कार्य कर…यालाच ध्येय समज आणि रक्षणकर्ता हो..! परत एकच सांगू इच्छितो हा तमाशा एक क्षणिक सुख आहे… आणि तुम्ही शहाणे असते तर तुम्ही त्याची पायरी चढले नसते. व्यसन हे कोणतेही असो ते शेवटी घातच करते म्हणून आजच याच ठिकाणी किशोर ने घेतली तशी शपथ घ्या की कुठल्याही क्षणिक सुखाच्या नादाला लागणार नाही आणि कुणाच्याही सांगण्यावरून कोणतच व्यसन करणार नाही. एवढी मोठी राक्षसांची, भूतांची प्रजाती त्यांच्या फालतूच्या अहंकारा पायी नष्ट होणार होती. ईश्वराला शरण जा….त्याची महिमा खूप मोठी आहे. त्याच्या कृपाप्रसादामुळेच मी आज तुम्हा सर्वांचा जीव वाचवू शकलो आणि शेवटी अमानवीय शक्ती दैवी शक्तीच्या पुढे हरली आणि नतमस्तक झाली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

झपाटलेली गंगी

horror story in marathi

माझे वडील नोकरीला असल्यामुळे आम्ही शहरात राहतो. आजकाल दैनंदीन जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे आणि त्यामध्ये निवांत वेळ फारसा मिळत नाही. आणि मिळलच तर तो जीवनावश्यक कामे करण्यात, कुटुंबाला वेळ देण्यातच निघून जातो. त्यामुळे भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणे हे अशक्यच झालेले आहे. असे विषय आजही ग्रामीण भागात फार चवीने बोलले जातात.

मी १० वी ला शिकत होतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मजा मारण्यासाठी माझ्या मामाच्या गावाला जायचो. मामाचे घर तसे धाब्याचे होते. जुन्या पद्धतीने बांधलेले. त्यातल्या त्यात ते शेतातच बांधलेले खूप मोठे, एकत्रित कुटुंब पद्धती माझ्या आजोबांना आवडायची, त्यामुळे आजी,आजोबा, ३ मामा, मामी, आत्या असे एकंदरीत शेतात काम करणारे गडी माणूस पकडून, १५ जण तिथे राहायचे. घराच्या समोरच थोडा बागबगीचा बनवलेला. बाजूलाच गुरांचा गोठा. आणि त्यात भरपूर गाई-म्हशी आणि बैल होते.

आम्ही शहरात राहणारे म्हटल्यावर छोट घर आणि त्याच छोट्टया जागेत वावरायचं-खेळायचं पण इकडे मामा कडे मोठ्ठ घर ते ही शेतात, त्यात आमच्यासाठी बनवलेली बाग, खेळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात मोकळ शेत. दिवसभर तिथेच उनाडक्या करायचो. माझ्या मामाला दोन मुल आणि मावशी, आत्या, या सर्वांची मुले-मुली आणि या सर्वांत मी मोठा  आणि सर्वाचा लाडाचा. खेळताना सकाळ ते संध्याकाळ कशी होऊन जायची कळायचं सुद्धा नाही. मामा सुद्धा मला विविध शेतीचे कामे,शेतीची माहिती द्यायचे तसेच बैलगाडी चालवायला शिकवायचे, आणि संध्याकाळी गाईचे दुध काढायला शिकवायचे. मी जेव्हा तिथे गोठ्यात जायचो तेव्हा त्या म्हशी पाहून भीती वाटायची कारण त्यातली एक म्हैस माझ्याकडे काही तीव्र आवेशाने बघायची जसकाही मला शिंगणे फेकून देणार. मी मामाला सांगितले की ही म्हैस इतर गुरांपेक्षा थोडी वेगळीच दिसते. त्यावेळी मामाने सांगितले की या गोठ्यात सर्वांत जास्त दुध देणारी व माझ्या परिस्थितीला बदलणारी हीच गंगी आहे. काही महिन्यापासून ती काही विचलित असते दोनदा तिचे रेडकू मरण पावले. सध्या बी ती गाभण आहे काय हुईल या काई दिवसात ते पांडुरंगच जाणो बाबा. तेव्हा पासून काही तिचे लक्ष ठीक दिसत नाहीत गड्या. तिला कुणी काही केल असाव, अंगावरून गेल असाव काई किंवा काई बाहेरच असाव… मला कळाल नाही की बाहेरच म्हणजे काय ? मी तसाच आजी कडे गेलो व आजीला विचारले की आज्जी मामा असे असे बोलले की बाहेरच म्हणजे काय हे मला कळाल नाही ग. जसे विचारले तसे आजीने मला जवळ बसवले व सांगू लागली बाळा तू यात पडू नकोस आणि गप्प झाली जा तू बाहेर खेळ. तरी माझी जिज्ञासा काही शांत होत नव्हती तसे मी आबा कडे गेलो ते आराम करत होते. तसा मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो, त्यांनी माझ्या कडे बघितल आणि बोलले की कसल्या विचारात आहेस सोन्या. मी त्यांना सर्व सांगितले तेव्हा त्यांनी तर मला तंबीच दिली की, तू आज नंतर त्या गोठया कडे जाणार नाहीस. आणि या प्रकारा पासून दूरच राहशील. ती लोक मला जेवढी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती तेवढा मला ते बाहेरच नेमक काय हे जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाली. दिवस जात होते माझे सवा लक्ष तिच्या प्रसूती कडे लागून होते आणि एक दिवस संध्याकाळी तिला परत रेडकू झाल आणि सर्व खुष झाले. पण मामा कुठल्या तरी टेंशन मध्ये दिसत होते मी राहवून विचारलं, काहो मामा आता झाल ना तिला रेडकू आणि बघा तिच्या जवळच आहे ते.  आता तर खूष व्हा तर मामा बोलले की मला ही तुफान येण्यापूवीची मशान शांतता दिसते गड्या.  ते पिल्लू काई अलगच दिसून रायल. तुमी जाऊन झपा मी येतोच. माझी आई मला घेऊन गेली आम्ही जाऊन झोपलो. तेवढ्यात काही वेळाने ती म्हैस कावऱ्या-बावऱ्या सारखी करायला लागली तिने हंबरायला सुरवात केली तिचा आवाज आणि तो आक्रोश त्यामुळे सर्वांची झोप उडाली. आम्ही अंगणात जाऊन बघितलं तर मामा सुद्धा रडायला लागले आणि बोलत होते की गंगे यावेळी पण म्या काईच नाई करू शकलो जे व्हायचं नव्हत ते घडल.

क्रमश :

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

बछडे खाणारे रक्तपिपासू पिशाच्च

आजकाल जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किंवा आपण ही कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टींमध्येच उरले आहेत . असो, आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत घडला आहे. तेव्हा मी ८ वीला शिकत होतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो. मामा , मामी , आजी असे सर्व जण तिथे असायचे सोबत मामाची मुले त्यामुळे मज्जाच मज्जा असायची. मामीचे घर जुने होते परंतु खूप मोठे , समोर छोटीशी बाग, आणि बाजूला गुरांचा वाडा. तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती . म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले की गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो २ दिवसात मरतो. आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंग मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं की हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतरी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात. मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला. तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येतो आणि काय करायचं ते बघतो . दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी जागीच होतो कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहिरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहिरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत. बछडे मरत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्यावर तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्याचेच तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली की सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने सांगितलं की पूजा आता चालू करू. पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची यादी मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो जोरजोरात कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . त्यावेळी ज्या घटना झाल्या त्याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुद्धा! आम्हाला वाटल की कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच, लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला. मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरी सुद्धा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रि
काने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले की यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . पूजा करताना अनेक विघ्न पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय. ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला. उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला आणि अचानक चक्कर येऊन तिथेच पडला. लोकांनी त्याला उचलले आणि तोंडावर पाणी मारले. थोड्या वेळाने शुद्धीत आल्यावर तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा. त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या. त्या नंतर पुन्हा कधीच गायीच्या बछड्याचा मृत्यू झाला नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

निशा आणि दृष्ट आत्मा

निशा माझी जुनिअर केजी पासूनची मैत्रीण आहे. आमची बिल्डींग टॉवरच्या प्रोजेक्टसाठी गेली. त्यामुळे आम्हाला भाड्याच्या रुममध्ये राहावे लागणार होते. निशाचे कुटुंब गोदरेज कंपनीच्या क्वार्टर्सच्या रूममध्ये राहायला गेले. त्या क्वार्टर्सच्या बाजूला खाडी असल्याने , रात्रीच्यावेळी तेथील वातावरण अतिशय भयानक दिसत असे. त्यामुळे तेथील रहिवासी रात्री ८च्या नंतर बाहेर फिरकत नसत. या क्वार्टर्स फक्त या कंपनीतल्या कामगारांनाच मिळत असल्याने , निशाच्या बाबांना ती रूम मिळाली होती.

सर्वकाही सुरळीत चालले होते , पण निशाला मात्र तिथे खूप विचित्र वाटत होतं , तसं तिने आपल्या घरच्यानाही बोलून दाखवलं. पण घरच्यांनी मात्र तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. जसजसे दिवस उलटू लागले तसतसा निशाला त्रास होऊ लागला. त्रास म्हणजे रात्रीच्यावेळी मधेच ती खाडकन उठून बसायची आणि झोपेतच मोठमोठ्याने ओरडायची की, “मला नाही यायचे आहे तुझ्यासोबत , मला त्रास नको देउस “, पण तरीही तिच्या घरच्यांना वाटले की ,कदाचित तिला एखादं वाईट स्वप्न पडल्यामुळे ती अशी वागत असावी, म्हणून त्यांनीही याकडे जास्त लक्ष दिले नाही . पण हे प्रकार काही थांबले नाहीत. एक दिवस निशाच्या स्वप्नात एक तरुण मुलगा आला . तो तिला वारंवार सांगत होता, की “तू माझी होणारी बायको आहेस . तू माझ्याशी लग्न कर , मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी तुझा जीव घेईन ” अशाप्रकारे तो रोजच निशाच्या स्वप्नात येउन तिला सतावू लागला होता. आणि निशाचा हा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. निशाचे घर मोठे असल्याने, निशा रात्री २ वाजता उठून अख्या घरभर फिरायची. आणि त्यांच्या बाल्कनीत जाऊन एकटीच बडबडत बसायची. असे प्रकार आता रोजच होऊ लागले आणि सकाळी मात्र तिची तब्येत आणखीनच खराब होत असे. आता मात्र तिच्या घरच्यांना तिची काळजी वाटू लागली होती. पण त्यांना भुताटकीच्या प्रकारावर मात्र तिळमात्र विश्वास न्हवता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना बोलावून निशावर उपचार सुरु केले , पण या उपचारांचाही तिच्यावर काहीच प्रभाव होत न्हवता.
एके दिवशी अशीच निशा रात्री उठून सार्या घरभर फिरू लागली आणि नंतर बाल्कनीत जाऊन बसली होती , तेव्हा अचानक तिच्या आईला जाग आली . निशा संध्याकाळच्या वेळी कधी बाल्कनीत उभी राहत नसे, त्यामुळे तिला बाल्कनीत उभी राहून त्या खाडीकडे बघताना पाहूनसुद्धा खूप भीतीदायक वाटत होते, त्यामुळे इतक्या रात्री निशा एकटीच बाल्कनीत काय करतेय , कुणाशी बोलतेय हे पाहून तिच्या आईला फार आश्चर्य आणि भीतीही वाटली.आणि इतक्या रात्री तिला बाल्कनीत उभी राहिलेली पाहून , भीतीनेच का होईना तिच्या आईने तिला जोरात हाक मारली, “निशा , तिथे काय करतेयस तू!!” आईचा आवाज ऐकताच निशा एकाएकी गप्प झाली. तिच्या आईने पुन:पुन्हा हाक मारूनही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही, म्हणून तिची आई उठली आणि निशाजवळ गेली आणि तिला पुन्हा आवाज दिला असता निशाने आपल्या आईकडे पहिले, तेव्हा तिच्या आईने समोर जे काही पाहिले त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. निशाचे ते विचित्र रूप पाहून ती पूर्ण हादरली होती. तिचे विस्कटलेले लांबसडक केस . डोळ्यात एक प्रकारचा आगसदृश्य राग ,तिचे ते रागाने थरथरणारे होठ त्यातून तिचे विचित्र हसणे , आणि रात्रीची वेळ त्यामुळे एकंदरीत सर्वच वातावरण खूपच विचित्र आणि भयाण भासत होतं , तेवढ्यातूनही तिच्या आईने तिला विचारले, “काय झालं ग बाळा ?…इतक्या रात्री बाल्कनीत काय करतेयस तू ?” इतक्यात अचानक निशा हसता हसता मधेच रडू लागली अन् अचानक मुलाच्या आवाजात रागाने बोलू लागली, निशाची आई तिचे हे रूप पाहून खूपच घाबरली होती, त्यात तिच्या तोंडून असा मुलाचा भयानक आवाज ऐकून तर त्यांना आता चक्करच यायची बाकी राहिली होती . भीतीने त्यांच्या तोंडून साधा शब्दही फुटत न्हवता. त्यावेळी काय करावे, काय बोलावे हेच त्यांना सुचेनासे झाले होते. इतक्यात निशाच्या शरीरातील त्या मुलाचा आत्मा म्हणाला, की ” निशा माझी होणारी बायको आहे , आणि मी तिला घेऊनच जाणार आहे . कारण एकदा मी तिला गमावलं आहे, पण आता नाही गमावणार. आणि जर कुणी मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीला जिवंत नाही सोडणार” इतकं बोलून निशा आणखीनच भयानक घोगऱ्या आवाजात जोरजोरात किंचाळू लागली. ती रात्र इतकी भयानक असेल याची कल्पनाच कारण शक्य न्हवतं . नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली अन् निशा धडकन जमिनीवर बेशुध्द होऊन कोसळली. आणि लागलीच तिच्या आईने घरातील सर्वाना हक मारून बोलावले आणि निशाला उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आज पहिल्यांदा निशाच्या बोलण्यातील भयाणता त्यांना जाणवत होती. मग सर्वांनी हळूच निशाला उचलले आणि बेडवर नेवून ठेवले.
मग निशाच्या आईने घडलेला सर प्रकार तिच्या बाबांच्या कानावर घातला आणि तिच्या बाबांच्या गुरुंना घरी बोलावून घेण्यास सांगितले. दुसर्या दिवशी लगेच निशाच्या बाबांनी त्यांच्या परम पूज्य गुरुजींची भेट घेतली आणि सारा प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. आणि मग ते गुरुजीही सर्व हकीगत ऐकून त्यांच्या घरी येण्यास तयार झाले. जेंव्हा त्या गुरुजींनी निशाच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा सर्रकन एक वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्शून निघून गेली आणि तेव्हाच या घरात नक्कीच कुठलीतरी अमानवी शक्ती वास करत आहे, हे गुरुजींच्या लक्षात आले .
गुरुजी घरात आल्यापासून सतत कान टवकारून काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. मग ते जिथे निशाला झोपवले होते तिथे गेले. तिथे बेडवर निशा निपचित पडली होती. तिच्या चेहऱ्यावरचे सारे तेज नाहीसे झाले होते. मग त्यांनी हळूच मायेने निशाच्या डोक्यावरून हाथ फिरवला, इतक्यात फट्कन निशाने डोळे उघडले आणि ती रागाने गुरुजींकडे पाहू लागली . आता मात्र निशा आणखीनच चिडली होती. एखाद्या जंगली श्वापदाने शिकार पाहिल्यावर गुरगुरावे तशी निशा त्यांच्याकडे पाहून गुरगुर करू लागली. आता ती त्यांच्याकडे झेप घेणार इतक्यात निशाच्या भावाने व बाबांनी तिला घट्ट पकडून ठेवले. मग गुरुजींनी काही वेळ विचार करून निशाच्या बाबांना सांगितले, की निशाची अवस्था फारच बिकट झालीय आणि त्यासाठी लवकरात लवकर आता काहीतरी उपाय करावा लागेल अन्यथा ती दृष्ट आत्मा आपल्या दृष्ट उद्देशात सफल होईल. मग लगेच त्यांनी निशाच्या बाबांना एका लहान हवनाची तयारी करण्यास सांगितले.
सगळी तयारी झाल्यानंतर निशाला गुरुजींच्या समोर बसवण्यात आले पण निशा काही त्या हवनाच्या जवळ जाण्यास तयार न्हवती . ती जोरजोरात मोठ्याने किंचाळत होती अन् हाथ पाय आपटत होती तरीही कसेबसे तिला गुरुजींसमोर बसविण्यात आले आणि मग हळू हळू गुरुजींचे मंत्र उच्चारण सुरु झाले तसा अचानक घरातील संपूर्ण वातावरणात बदल जाणवू लागला. घरातील हवा गायब होऊन वातावरण कोंदट होऊ लागले आणि आता तर निशाच्याही हालचाली सुरु होऊ लागल्या होत्या . इतक्यात गुरुजींनी डोळ्यानीच निशाच्या बाबांना व भावाला इशारा केला व तिला घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. निशाच्या आईला मात्र तिची हि अवस्था बघवेनाशी झाली होती. त्या तोंडाला पदर लावून एका कोपऱ्यात उभ्या राहून रडू लागल्या.
आता मात्र निशाचा आवाज बदलून एका मुलाचा भयानक आवाजात ती बोलू लागली , तो म्हणाला ,” तुम्हाला सांगितलं होतं न कि माझ्या वाट्याला जायचं नाही म्हणून, निशा माझी आहे आणि मी तिला घेऊनच जाणार आहे , आणि जो कुणी मला अडवा येयील त्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही” आणि पाहता पाहता निशाचे रूपाच बदलू लागले , तिचे डोळे रक्तासारखे खूपच लाल झाले होते, तिचे बांधलेले केसही सुटले होते. आणि ती जोरजोरात ओरडत होती . तिचे हे रूप पाहून आता गुरुजी सोडले तर सर्वचजण खूप घाबरले होते. ओरडता ओरडता निशा मधेच आपले डोळे गरगर फिरवत होती आणि काहीतरी सांगत होती. मग गुरुजींनी आणखीनच मोठ्याने मंत्र उच्चारण्यास सुरवात केली आणि मंत्र उच्चारता उच्चारता गुरुजी स्वतःकडील गंगाजल निशाच्या अंगावर शिंपडू लागले . तशी निशाच्या शरीरातील त्या अतृप्त आत्म्याला आणखीनच त्रास होऊ लागला व तो तडफडू लागला. पण त्याचबरोबर बिचाऱ्या निशाचीही फरपट होत होती. तिच्या आई-बाबांना आपल्या मुलीची हि अवस्था तर बघवतच न्हवती. मग गुरुजी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी कसलासा अंगारा आपल्या हातात घेतला आणि निशाच्या कपाळावर लावला. तो अंगारा लावल्याबरोबर निशाच्या शरीरातील त्या मुलाच्या आत्म्याला आता तो त्रास असह्य झाला आणि मग निशाकर्वी तो गुरुजींसमोर हाथ जोडून माफी मागू लागला. मग गुरुजींनी त्याला दटावले व निशाचे शरीर सोडून जाण्यास सांगितले. नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली आणि एकाएकी निशा पुन्हा बेशुध्द होऊन जमिनीवर कोसळली. मग गुरुजींनी मोठ्या मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला आणि मग त्यांनी निशाचे संरक्षण व्हावे यासाठी एक तावीज काही मंत्र उच्चारून निशाच्या गळ्यात बांधले व निशाच्या घरच्यांना तिला घेऊन त्यांच्या कुळदैवतेला जाऊन येण्यास सांगितले. व लवकरात लवकर ते घरही सोडून जाण्यास सांगितले कारण या घरात निशासोबत पुन्हा असे काही होण्याचा धोका नाकारता येत न्हवता. मग त्याप्रमाणे काही दिवसांतच त्या लोकांनी ते घर सोडले व दुसर्या नवीन घरात राहण्यासाठी निघून गेले. मात्र आपल्या मुलीबाबत असे का झाले हा विचार निशाच्या बाबांना स्वस्थ बसू देत न्हवता , त्यामुळे त्यांनी त्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात त्या घराविषयी चौकशी केली असता त्यांना असे कळले, कि काही वर्षापूर्वी याच घरात मुकेश नावाच्या एका तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती . कारण त्याचे स्नेहा नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते , पण स्नेहाने मात्र त्याला साफ नकार दिला व चारचौघात त्याचा पान उताराही केला होता त्यामुळे मुकेश खूपच दुखावला गेला होता. इतका कि त्याने जगण्यापेक्षा मरणाचा मार्गाच योग्य समजला. त्या दिवसापासून मुकेशशची आत्मा त्या घरात वास करत होती, अनेकवेळा त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून ओरडण्याचा आवाजही येत असे या घरात अनेकांना अनेकांना वाईट अनुभव आल्यामुळे त्या घरात कुणी राहण्यास, व कुणीच काही बोलण्यास धजावत न्हवते. त्यामुळे त्यांची निशाच्या कुटुंबीयांनाही सावध करण्याची हिम्मत झाली न्हवती आणि म्हणूनच निशाच्या घरच्यांना या घटनेबाबतीत काहीच माहित नसल्यामुळे त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला होता.
निशाच्या बाबांनी या मोठ्या संकटातून त्यांच्या कुटुंबाला वाचवल्याबद्दल देवाचे व त्यांच्या गुरुजींचे खूप मनापासून आभार मानले. एके दिवशी तिच्या आईनेच आम्हाला भेटायला आल्यानंतर हि सगळा किस्सा माझ्या आईला सांगितला होता , त्या घटनेनंतर काही दिवसांनी मला निशा भेटलीही होती , तिला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तिच्यासोबत घडलेली हि भयानक घटना झरझर डोळ्यासमोरून गेली. एकदा असेही वाटून गेले की निशाला याबाबत काही विचारणा करावी कि नक्की त्यावेळी काय घडले होते , त्यानंतर तिला याबाबतीत काय वाटतंय, पण माझी काही हिम्मतच झाली नाही आणि मला तिला पुन्हा दुखावयाचेही न्हवते. तरी या सर्व भयंकर प्रकारातून माझी जिवलग मैत्रीण मात्र सुखरूप बाहेर पडली हेच माझ्यासाठी खूप आनंददायी होतं