खिशात फोन आणि त्यात ‘व्हाट्सऍप ‘ नाही असं शक्य आहे का ? स्मार्टफोनच्या दुनियेत व्हाट्सऍप ने अद्भुत क्रांती घडवून आणली आहे. काही वर्षाआधी मेसेज ची देवाण घेवाण SMS च्या माध्यमातून होत होती. त्याला बदलून अगणित मेसेज आणि एकाच वेळी कित्येक मित्र-मैत्रिणी सोबत बोलण्याची सोय आणि ते सुद्धा फक्त टेक्स्ट नव्हे तर छान ग्रीटिंगद्वारे फक्त ‘व्हाट्सऍप’ ने आणली.
आपण रोज व्हाट्सऍप वापरतो. ग्रुपमध्ये एकाचवेळी अनेक लोकांशी संभाषण करतो. रोज कित्येक मेसेजची देवाणघेवाण होत असते. कित्येकांना ओळखतो तर कित्येकांना ओळखत सुद्धा नाही. ग्रुप मध्ये अनेक लोकांसोबत संभाषण करताना प्रत्येकाला आलेला मेसेज दिसत असतो. पण तुम्ही अनेकांना मेसेज केला आहे परंतु त्यांच्याकडून आलेला मेसेज फक्त तुम्हीच बघू शकता इतर नाही असं काही केलेलं आहे का ? अगदी ग्रुपप्रमाणे तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांशी बोलू शकता पण त्यांचा आलेला मेसेज फक्त तुम्हालाच दिसू शकतो असं फिचर व्हाट्सऍप मध्ये आहे, अगदी पूर्वीपासून ! काहींना ते माहिती असेल तर कित्येकजण अजूनही त्यापासून अनभिज्ञ असतील.
आपल्या व्हाट्सऍप मध्ये गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या मेनू आयकॉन वर क्लिक करा तिथे ‘new brodcast message’ दिसेल त्याला क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर आपली कॉन्टॅक्ट लिस्ट दिसू लागेल त्यामधून ज्यांना मेसेज पाठवायचा त्यांना क्लिक करा म्हणजे ते सिलेक्ट होतील. असे आपल्याला हवे तेवढे मित्र आपण ऍड करू शकतो. त्या नंतर मोबाईल च्या खालच्या उजव्या बाजूला असलेल्या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. त्या नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ‘मेसेज विंडो’ दिसू लागेल त्यावर वरती किती “receipant” आपण ऍड केले ते दिसेल आणि खाली ‘मेसेज’ टाईप करण्यासाठी बॉक्स दिसेल. अशा प्रकारे आपण सर्वाना एकच वेळी मेसेज पाठवू शकतो. जरी ते एकाच ग्रुप मध्ये नसतील तरीही. आपल्याला प्रत्येकाला काही संदेश द्यायचा असेल अथवा काही सांगायचे असेल. परंतु त्यांचा रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसायला हवा तर हे फिचर त्यासाठीच आहे. त्यांनी दिलेला रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसेल इतरांना नाही. तुम्ही जर हे फिचर वापरले नसेल तर एकवेळ नक्कीच वापरून बघा.