झटपट लसूण सोलण्याच्या टिप्स

घरात कुणाला लसूण सोलायला दिला कि नाकावर वळ्या पडतात कारण कि तो लवकर सोलल्या जात नाही. ते किचकट काम आहे. मग त्यासाठी विविध प्रकारचे गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स आपल्या कडे असतात किंवा आपण सोलत बसतो.  पण आज आपण बघणार आहोत काही अशा टिप्स कि या टिप्स मुळे  लसूण  तुम्ही झटपट सोलू शकणार.  तुम्हाला गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स वापरण्याचे काम नाही किंवा उगाच वेळ घालवायचा काम नाही.

१) एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका. एका तासानंतर हे पाण्यातुन काढून घ्या. यावर थोडा दाब द्या हाताने अलगद साल काढू शकता.

२) फक्त ३० सेकेंदांसाठी लसणाच्या पाकळ्या मायक्रोवेवमध्ये ठेवा. जेव्हा काढणार तेव्हा लसणाने थोडी साल सोडलेली दिसेल लसूण थंड झाल्यावर सहजच साल काढू शकता.

३) जर तुमच्या जवळ मायक्रोवेव नसेल तर तुम्ही याचे साल काढण्यासाठी कढईचा वापर करु शकता. त्या करता गॅस वर कढई ठेवा व थोडी गरम झाल्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या टाका व परतून घ्या (मात्र लक्षात ठेवा कढईत आपल्याला काहीच टाकायचे नाही आहे. जसे तेल व पाणी देखील नाही.) नंतर ते लसूण साल सोडलेली दिसतील व तेव्हा ते थंड झाल्यावर हाताने अलगद साल काढू शकता.

४) लसणाच्या पाकळ्या जमिनीवर किंवा हातावर रगडा ते साल सोडेल मग आरामात तुम्ही साल काढू शकता. .

५) दुसरी पध्दत म्हणजे, लसुणला चाकु खाली पकडा आणि हाताने दाबा. असे केल्यास लसणाची साल वेगळी होईल व नंतर हाताने ती काढून घ्या.

६) तुम्ही लसुणला बॉटलमध्ये १०-१५ मिनीटे ठेवा. नंतर हे भांडे किंवा डब्बा १० मिनिट हलवा. लसुण आपोआप सोलून निघतो व काही राहिलेली साल हाताने काढून घ्या.

विना ग्रुप बनवता अनेकांना मेसेज कसा पाठवाल ?

whatsapp message

खिशात फोन आणि त्यात ‘व्हाट्सऍप ‘ नाही असं शक्य आहे का ? स्मार्टफोनच्या दुनियेत व्हाट्सऍप ने अद्भुत क्रांती घडवून आणली आहे. काही वर्षाआधी मेसेज ची देवाण घेवाण SMS च्या माध्यमातून होत होती. त्याला बदलून अगणित मेसेज आणि एकाच वेळी कित्येक मित्र-मैत्रिणी सोबत बोलण्याची सोय आणि ते सुद्धा फक्त टेक्स्ट नव्हे तर छान ग्रीटिंगद्वारे फक्त ‘व्हाट्सऍप’ ने आणली.

आपण रोज व्हाट्सऍप वापरतो. ग्रुपमध्ये एकाचवेळी अनेक लोकांशी संभाषण करतो. रोज कित्येक मेसेजची देवाणघेवाण होत असते. कित्येकांना ओळखतो तर कित्येकांना ओळखत सुद्धा नाही. ग्रुप मध्ये अनेक लोकांसोबत संभाषण करताना प्रत्येकाला आलेला मेसेज दिसत असतो. पण तुम्ही अनेकांना मेसेज केला आहे परंतु त्यांच्याकडून आलेला मेसेज फक्त तुम्हीच बघू शकता इतर नाही असं काही केलेलं आहे का ? अगदी ग्रुपप्रमाणे तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांशी बोलू शकता पण त्यांचा आलेला मेसेज फक्त तुम्हालाच दिसू शकतो असं फिचर व्हाट्सऍप मध्ये आहे, अगदी पूर्वीपासून ! काहींना ते माहिती असेल तर कित्येकजण अजूनही त्यापासून अनभिज्ञ असतील.

आपल्या व्हाट्सऍप मध्ये गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या मेनू आयकॉन वर क्लिक करा तिथे ‘new brodcast message’ दिसेल त्याला क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर आपली कॉन्टॅक्ट लिस्ट दिसू लागेल त्यामधून ज्यांना मेसेज पाठवायचा त्यांना क्लिक करा म्हणजे ते सिलेक्ट होतील. असे आपल्याला हवे तेवढे मित्र आपण ऍड करू शकतो. त्या नंतर मोबाईल च्या खालच्या उजव्या बाजूला असलेल्या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. त्या नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ‘मेसेज विंडो’ दिसू लागेल त्यावर वरती किती “receipant” आपण ऍड केले ते दिसेल आणि खाली ‘मेसेज’ टाईप करण्यासाठी बॉक्स दिसेल. अशा प्रकारे आपण सर्वाना एकच वेळी मेसेज पाठवू शकतो. जरी ते एकाच ग्रुप मध्ये नसतील तरीही.  आपल्याला प्रत्येकाला काही संदेश द्यायचा असेल अथवा काही सांगायचे असेल.  परंतु त्यांचा रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसायला हवा तर हे फिचर त्यासाठीच आहे. त्यांनी दिलेला रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसेल इतरांना नाही. तुम्ही जर हे फिचर वापरले नसेल तर एकवेळ नक्कीच वापरून बघा.