"भाऊराया"

अश्रुंच तेल डोळ्याचा दिवा – २

पाहते वाट मी तुझी
आज भाऊराया……

आठवणीचे बंध, मायेचा धागा – २
प्रेमाची गाठ, हात मनगटी
बांधशील का तुझ्या
आज भाऊराया……

लहानपण आठवले, पाळण्यातला तु – २
मला पाहुन कसा, खुद्कन हसला
होता भाऊराया……

पहिले पाऊल तुझे पडले या भुईवर – २
पडता-पडता तुला, मी सावरले
होते भाऊराया……

मग जोरात पळु लागला
मागे मी धावु लागले – २
घास मुरवी तुझ्या, भरविला
होता भाऊराया……

जरा मोठा झाला भांडुही लागला – २
वेणी माझी ओढली होती
आठवले का भाऊराया……

आता मात्र शहाणा झाला
लग्न मांडवात बसला – २
हळद गाली तुझ्या मी लावली
होती भाऊराया……

वहिनी घरात आली
आनंद मनी झाला – २
सोनियाचा तो दिवस
होता भाऊराया……

आता बाप तु झाला
थोर मोठाही फार झाला – २
बहिणीला या मात्र
विसरला तु भाऊराया……

तरीही तुझी वाट अजुनही मी पाहते.
तरीही तुझी वाट अजुनही मी पाहते.
नाही तु आलास
तरी स्वप्नात राखी बांधते
तुला मी भाऊराया……
तुला मी भाऊराया……

 

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)