आरोग्यदायी आवळा

सध्या बाजारात आवळे उपलब्द्ध आहेत. तसे हिवाळ्यात येणारे हे फळ आहे. हिरव्या रंगाचे, औषध गुणांनीयुक्त असे हे फळ तुरट व आंबट चवीचे असते. आवळा हे फळ डोळ्यांसाठी खूपच हितकर असते, तिन्ही दोषांना संतुलित करून, शुक्रधातूचे पोषण करते. हे फळ आंबट असल्याने वात शांत करते, गोड व थंड असल्याने पित्त शांत करते, तुरट असल्याने कफ शांत करते. आवळ्यापासून विविध पदार्थ बनवली जातात. आवळा सुपारी, आवळा लोणचे, आवळा चूर्ण, आवळा मुरब्बा.
असे ऐकण्यात आहे रोज एक चमचा आवळा रस किंवा चूर्ण घेतल्याने मनुष्य जन्मभर निरोगी राहतो.त्याला लवकर आजार होत नाहीत. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. यात पांच रस आहेत. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षडरस) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. म्हातारपण येऊ न देणे हा आवळ्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे. आयुर्वेदातही आवळ्यापासून निरनिराळी औषधे तयार करतात.
धार्मिक दृष्ट्या याला फार महत्व आहे. आवळ्याच्या झाडत निरनिराळ्या देव देवता वास्तव करतात अशी मान्यता आहे. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे असा समज आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्यात केल्या जाणार्‍या तुळशीच्या लग्नात आवळा, उस, बोरे यांना महत्व आहे. आवळा हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी समजूत आहे. ज्याच्या घरी आवळ्याचा वृक्ष असतो त्या घरात भूतबाधा होत नाही असा समज आहे.
अशा या विविध गुणांनीयुक्त आवळा फळाची माहिती व उपयोग आपण आज बघणार आहोत.

आवळ्याचे उपयोग

आवळ्याच्या रसाने ज्ञानतंतू सशक्त होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
पोटात जंत झाल्यास आवळा उपयोगी ठरतो.
चीरयौवन प्राप्तीसाठी आवळा उपयोगी ठरतो.
सांधेदुखी मध्ये आवळा उपयोगी आहे.
केसांच्या समस्या यांवर सुद्धा आवळा वापरल्या जातो.
केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा खूपच उपयोग होतो.
इतर फळांपेक्षा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असल्याने रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
विकारग्रस्ताला विकारमुक्त करण्यासाठी विकारमुक्ताला जास्त सशक्त करण्यासाठी आणि वृद्धांना स्फूर्ती आणण्यासाठी आवळा गुणकारी आहे.
खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेतल्याने चांगला फायदा होतो.
आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी आहे. याच्या सेवनामुळे आम्ल्पित्ताचा त्रास बरा होतो.
उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो. अशा प्रकारे आवळा विविध विकारांवर उपयोगाचा आहे.

औषध म्हणून आवळ्याचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

पावसाळ्यात मेकअप कसा असावा ?

आपण मेकअप करीत असतांना काय काळजी घ्यावी, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरावी, मेकअप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं असे अनेक प्रश्न मनात येतात याचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत.

पावसाळ्यातील वातावरण हे उष्ण आणि दमट असते. म्हणूनच मेकअपही त्यानुसारच करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही सौंदर्यप्रसाधने आणण्यासाठी पावसाळ्याची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जाणार तेव्हा वॉटरप्रूफ किंवा वॉटररेसिस्टंट मेकअप कॉस्मेटिक्स आणायला विसरू नका. पावसाळ्यात तुम्ही कमी मेकअप करून कसे सुंदर दिसणार यासाठी प्रयत्न करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

निरोगी त्वचेसाठी- पावसाळ्यातील उष्ण आणि दमट वातावरणामुळे त्वचेवर मुरूम येण्याची शक्यता असते. त्यासाठी स्नानापूर्वी चेहरा, मान, हात यांना दुधाने मालिश करावे. याने त्वचा चांगली राहते. तसेच दिवसातून तीन-चार वेळा चेहरा थंड पाण्याने धुऊन वॉटर बेस्ड मॉइश्चराइजरचा वापर तुम्ही करू शकता. ज्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होते. या करीता तुम्ही बर्फाने चेहऱ्याला ५ ते १० मिनिटे मसाज केल्यास अतिरिक्त लाभ आपणास मिळेल. असे केल्यास त्वचा ताजी, फ्रेश व चांगली राहते यामुळे मेकअप जास्त काळ टिकून राहतो. जर आपली स्किन तेलकट असेल तर अस्ट्रेन्जंट व कोरडय़ा स्किनकरता टोनर चा वापर करू शकता.

डोळ्यांचा मेकअप- पावसाळ्यात डोळ्यांचा मेकअप करतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण जास्त वेळ खर्च करून जर तुम्ही आयशॅडो, मस्करा, लाइनर लावत असाल तर ते पावसाचे काही थेंब पडताच पूर्ण मेकअप खराब होईल याचा आपणास अनुभव देखील असेल. मेकअप खराब होण्याचे आणखी एक कारण असु शकते ते म्हणजे दमट हवा. आय लाइनरपेक्षा कोहल वापरू शकता. कारण आय लाइनरच्या तुलनेत कोहलची पाण्याला प्रतिकार करण्याची क्षमता जास्त काळ असते. पावडर आय शॅडोमध्ये तुम्ही टरक्वाइस, ब्राउन, ब्ल्यू, ग्रीन आणी पिंक शेड्सची निवड देखील करू शकता. वॉटरप्रूफ मस्काऱ्याचा अथवा लाईट ब्रो पेन्सिलचा देखील वापर करू शकता.

फाउंडेशन- पावसाळ्यात फाउंडेशन करणे टाळनेच योग्य आहे. पाण्याने किंवा घामाने चेहरा ओला झाल्यास चेहऱ्यावर फाउंडेशन निघून जातो त्यामुळे त्याच्या ऐवजी लूज पावडर चा वापर करू शकता.

लिपस्टिक- पावसाळ्यात झोपताना ओठांना हलकीशी कोल्ड क्रीम लावावी. त्याने ओठ मुलायम राहतील. पावसाळ्या मध्ये ओठांचा मेकअप थोडासा लाईट पण मोहक वाटणारा असणे आवश्यक आहे. भडकपणा येणार नाही याकडे लक्ष असू द्यावे. त्यासाठी पारदर्शक लिप ग्लॉस वापरावा. चांगला लूक टिकवून ठेवण्यासाठी तो दिवसातून अनेक वेळा लावता येऊ शकतो. ग्लॉसी लिपस्टिकपेक्षा मॅटला प्राधान्य द्यावे. पिंक व ब्राउनची विविध शेड्सची निवड तुम्ही करू शकतात. तुम्ही लिप लायनरचा वापर करतांना फक्त ते वॉटरप्रूफ आहे याची खात्री करून घ्यावी. नाहीतर पावसाचे थेंब पडताच ते निघून जाऊ शकतो.

भुवया- पावसाळ्यात भुवया नेहमी व्यवस्थित कोरलेल्या असाव्यात. तसेच त्या क्लियर किंवा टिन्टेड जेलनी सेट करा.

ब्लशर- पावसाळ्यात कोऱ्या चेहऱ्याला ब्लशरने नक्कीच गेटअप येतो. ब्लशरची शेड सिलेक्ट करतांना तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित ब्लेंड होईल असाच निवडावा. पावसाळ्यात क्रीमी व स्पार्कल असलेले ब्लशर सहसा वापरू नये.

अशा प्रकारे पावसाळ्यात मेकअप करीता या टिप्स वापरून तुम्ही आणखी सुंदर व पावसापासुन आपल्या मेकअपची काळजी घेऊ शकता.