इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘फेसबुक’ ची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’

जगाच्या कान्याकोपर्‍यात इंटरनेट पोहोचाविण्यासाठी फेसबुक सज्ज झाले असून जगातील अतिदूर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. या प्रकल्पाला ‘कनेक्टव्हिटी लॅब’ असे नाव देण्यात आले आहे.

सॅटेलाइट तसेच ड्रोन विमानाची मदत घेऊन जगातील अतिदुर्गम भागात इंटरनेट पोहोचण्यासाठी फेसबुक हा प्रयत्न करणार आहे. या साठी ‘फेसबुक’ आणि नेटवर्किंग कंपनी ‘इंटरनेट.ऑर्ग’ यांच्यात करार झाला आहे. अर्थातच याचा फायदा फेसबुक ला होणार असून. या द्वारे फेसबुक चे यूज़र्स वाढणार आहेत. फेसबुकची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ विकसित करण्यासाठी ड्रोन, सॅटेलाइट आणि लेजर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अद्याप हा प्रकल्प पूर्ण कधी होणार या बाबत काही स्पष्ट केले नाही. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन आणि जियोसिंक्रोनस सॅटेलाइट सोडले जाईल. त्यामाध्यमातून जगाच्या प्रत्येक भागात इंटरनेट पोहोचेल, असे झुकेरबर्ग म्हणाले. अवकाशात झेपावणार्‍या एअरक्राफ्ट्सद्वारा अदृश्य लेजर बीमदेखील जमिनीच्या दिशेने सोडले जाणार आहेत. त्यामाध्यमातून इंटरनेटचा स्पीड वाढविण्यास मदत होणार आहे.