झटपट लसूण सोलण्याच्या टिप्स

घरात कुणाला लसूण सोलायला दिला कि नाकावर वळ्या पडतात कारण कि तो लवकर सोलल्या जात नाही. ते किचकट काम आहे. मग त्यासाठी विविध प्रकारचे गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स आपल्या कडे असतात किंवा आपण सोलत बसतो.  पण आज आपण बघणार आहोत काही अशा टिप्स कि या टिप्स मुळे  लसूण  तुम्ही झटपट सोलू शकणार.  तुम्हाला गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स वापरण्याचे काम नाही किंवा उगाच वेळ घालवायचा काम नाही.

१) एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका. एका तासानंतर हे पाण्यातुन काढून घ्या. यावर थोडा दाब द्या हाताने अलगद साल काढू शकता.

२) फक्त ३० सेकेंदांसाठी लसणाच्या पाकळ्या मायक्रोवेवमध्ये ठेवा. जेव्हा काढणार तेव्हा लसणाने थोडी साल सोडलेली दिसेल लसूण थंड झाल्यावर सहजच साल काढू शकता.

३) जर तुमच्या जवळ मायक्रोवेव नसेल तर तुम्ही याचे साल काढण्यासाठी कढईचा वापर करु शकता. त्या करता गॅस वर कढई ठेवा व थोडी गरम झाल्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या टाका व परतून घ्या (मात्र लक्षात ठेवा कढईत आपल्याला काहीच टाकायचे नाही आहे. जसे तेल व पाणी देखील नाही.) नंतर ते लसूण साल सोडलेली दिसतील व तेव्हा ते थंड झाल्यावर हाताने अलगद साल काढू शकता.

४) लसणाच्या पाकळ्या जमिनीवर किंवा हातावर रगडा ते साल सोडेल मग आरामात तुम्ही साल काढू शकता. .

५) दुसरी पध्दत म्हणजे, लसुणला चाकु खाली पकडा आणि हाताने दाबा. असे केल्यास लसणाची साल वेगळी होईल व नंतर हाताने ती काढून घ्या.

६) तुम्ही लसुणला बॉटलमध्ये १०-१५ मिनीटे ठेवा. नंतर हे भांडे किंवा डब्बा १० मिनिट हलवा. लसुण आपोआप सोलून निघतो व काही राहिलेली साल हाताने काढून घ्या.