हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणारा. रोज त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतच असतो. आपल्याला काळे मिरे म्हटले कि मसाला आठवतो आणि याचा उपयोग फक्त मसाल्यातच होत असावा असा फारसा समज आहे. बहुतेक ठिकाणी तिखटाला पर्याय म्हणून काळ्या मिर्याची पूड वापरतात. काळे मिरे- सॅलड, सूप, चायनीज पदार्थ, सांबार, मसालेभात अशा अनेक पदार्थामध्ये काळ्या मिऱ्याचा वापर होतो. मिरे उष्ण व तीक्ष्ण असल्याने कफ व वातनाशक आहेत. मिरे हे पपईच्या वाळलेल्या बियांसारखेच दिसतात. पण हे काळे मिरे फक्त मसाल्यापुरते मर्यादित नसून आयुर्वेदात यांचा औषधी उपयोग सुद्धा आहे. चला तर मग या महान गुणांच्या छोट्याशा काळ्या मिऱ्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत यांचे औषधी उपयोग.
नाक बंद झाल्यास सुती कपड्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, इलायची आणि जिरे सम प्रमाणात घेऊन त्याची पोटली बांधावी आणि ती नाकाने हुंगावी यामुळे नाक मोकळे होते.
चहामध्ये काळे मिरे, सुंठ, गवतीचहा टाकून बनवलेला चहा सर्दी-खोकल्यावर उत्तम आहे.
खोकल्यामध्ये काळी मिरी गरम दुधात मिसळून ते दूध घेतल्यास फायदा होतो.
मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूक वाढते.
२ चमचे दही, १ चमचा साखर आणि ६ ग्रॅम काळे मिरे बारिक करून हे मिश्रण एकत्र करावे. यामुळे कोरडा खोकला आणि डांग्या खोकला दूर होतो.
पित्तामुळे पोटात गुडगुड होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.
वजन कमी करण्यासाठीही काळी मिरे हे उपयोगाची आहे. यामुळे शरीरातील फॅटही कमी होतो. तसेच कॅलरीज जाळण्यासाठी उपयुक्त आहे.
डोळ्यांसाठी उपयुक्त आहे काळे मिरे. रोजच्या आहारात याचा वापर करावा.
काळे मिरे टाकून चहा पिल्यास चेहऱ्यावरील दाग-धब्बे दूर होतात चेहरा चांगला होतो.
दात दुखत असल्यास काळे मिरे दाताखाली चावून दाबून ठेवावे यामुळे दात दुखीवर आराम मिळतो.
पायरिया,दातांच्या समस्या, हिरड्या, यामध्ये मिरे पूड मीठ एकत्र करून दातावर लावावे आराम मिळेल.
एक ग्लास ताकामध्ये थोडी मिरे पूड मिसळून पिल्यास पोटातील जंतांचा त्रास कमी होतो.
श्वासासंबंधी काही त्रास असेल तर पुदिना व मिरे यांचा चहा मध्ये समावेश करावा.
स्मरणशक्ती साठी सुद्धा काळे मिरे उपयुक्त आहेत.
पोटातील गॅस, ऍसिडिटी सुद्धा यामुळे कमी होते आराम मिळतो.
अशाप्रकारे विविध औषधी उपयोग आहेत काळ्या मिऱ्याचे.
औषध म्हणून काळी मिरीचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.