भारतीय रेल्वेत कॉन्स्टेबल पदासाठी भरती

railway police

भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या पुरुष उमेदवारांमधून ४४०३ आणि महिला उमेदवारांमधून ४२१६ अशा एकूण ८६१९ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात हिंदी मध्ये पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/documents/NotificaitonNo-012018-Constable-Hindi.pdf

 

संपूर्ण जाहिरात इंग्रजी मध्ये पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/documents/NotificationNo-012018-Constable-English.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/

साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार!

no-chain-to-stop-train in buldana news

अनेक वर्षापासून असलेली रेल्वेतील ‘साखळी’ आता काढून टाकण्यात येणार आहे. होय, रेल्वे प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार आहे. काही रेल्वेंसाठी याचे काम सुरू झाले आहे.

विनाकारण कुठलीही गंभीर परिस्थिती नसताना साखळी ओढण्याचे प्रकार सातत्याने घडून येत असल्याने रेल्वेला तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. परन्तु अचानक आणीबाणी सारखी परिस्थिती आली तर काय करता येणार ? तर त्या साठी आता रेल्वे थांबविण्यासाठी यापुढे रेल्वेचा चालक आणि सहचालकाचे मोबाइल नंबर रेल्वेच्या डब्यांमध्ये फलकांवर लावले जाणार असून, या क्रमांकावर फोन करून रेल्वे थांबविता येणार आहे. त्याचप्रमाणे अडचणीच्या स्थितीमध्ये दर तीन डब्यांमागे एक वॉकीटॉकी असलेले कर्मचारीही कार्यरत असतील. प्रवाशांच्या अडचणीच्यावेळी हा कर्मचारी रेल्वेच्या ‘इंजिन केबिन’शी संपर्क साधेल.’ या निर्णयामुळे रेल्वेत प्रवाशांकडून होणारे गैरवर्तन कमी होईल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रवाशांकडून कोणतेही कारण नसताना रेल्वे थांबविल्यामुळे दररोज अंदाजे २५ रेल्वे विलंबाने धावतात. याचा मोठा फटका रेल्वेला बसतो आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात येणार आहे. उत्तर भारतात याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. कुठलेही कारण नसताना केवळ गंमत म्हणून किंवा वैयक्तिकरित्या साखळी खेचण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा येथे जास्त आढळून आले आहेत. त्यामुळे रेल्वे हा निर्णय घेत आहे.