भगवान परशुराम जयंती

Parashuram Jayanti in Buldhana

ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात्।। भगवान परशुराम श्रीहरी विष्णू चे अवतार आहेत. त्यांचा हा अवतार त्रेता युगातील रामायण काळातील आहे. तसेच त्यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी माता रेणुका यांच्या उदरी झाला त्यांचे पिता महर्षि जमदग्नि आहेत. एका कथेनुसार ऐकण्यात आहे कि जेव्हा राजांचा अत्याचार वाढला होता तेव्हा पृथ्वी माता गाय रूप घेऊन भगवान विष्णू कडे जाऊन प्रार्थना केली आणि अत्याचारी राजांचा नाश करावा अशी विनंती करू लागली तेव्हा प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी पृथ्वी मातेला वचन दिले कि दृष्टांच्या नाशासाठी व धर्म स्थापणे करीता भार्गव कुळात महर्षि जमदग्नि चे पुत्र म्हणून जन्म घेईल व सर्व अत्याचारी राजांचा नाश करेल. आपल्या दिलेल्या वचना नुसार श्रीहरी विष्णूंनी अवतार घेतला. भगवान परशुराम शिवशंकराचे भक्त होते शंकराच्या कृपा प्रसादाने त्यांना परशु प्राप्त झाले व त्यांनी ते परशु धारण केले तेव्हा पासून ते परशुराम या नावाने प्रसिद्धीस आले.

तसेच त्यांचे आरंभिक शिक्षण महर्षी विश्वामित्र व ऋचीक ऋषी यांच्या आश्रमात झाले तेथे त्यांना महर्षी ऋचीक यांच्या कडून सारंग नावाचा दिव्य धनुष्य व ब्रह्मर्षी कश्यप यांच्या कडून विधिवत अविनाशी वैष्णव मंत्र प्राप्त झाला. त्यानंतर चे शिक्षण कैलास येथील गीरीश्रुंग येथे भगवान शंकराच्या आश्रमात विद्या प्राप्त केली त्यात त्यांनी विविध दिव्यास्त्र,विद्युदभि नावाचा परशु प्राप्त केला. तसेच त्यांना विविध वरदान प्राप्त होते.

भगवान परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी क्षत्रीयविहीन केली होती हे प्रसिध्द आहेच.तसेच ते माता पिता यांचे भक्त आणि अज्ञाकारी होते. भगवान परशुराम शस्त्र विद्येचे महान गुरु होते, तसेच महाभारतामध्ये आचार्य द्रोणाचार्य,पितामह भीष्म व दानवीर कर्ण हे त्यांचे शिष्य होते. अजर, अमर, अविनाशी आहेत भगवान परशुराम. आज पण महेंद्र पर्वतावर निवास करतात भगवान परशुराम.