मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाला विएतनाम च्या समुद्रात अपघात

संपर्क तुटलेलं मलेशियन एअरलाईन्सचं प्रवासी विमान, व्हीएतनामच्या समुद्रात कोसळलं आहे. व्हीएतनाम माध्यामांनी याबाबतची माहिती दिली आहे. या विमानात 12 कर्मचारी आणि 227 प्रवाशांसह 239 जण होते.

हे विमान क्वालालंपूरहून चीनची राजधानी बिजींगकडे जातं होतं..शुक्रवारी साडेचारला निघालेलं हे विमान रात्री साडेदहापर्यंत चीनमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु विमानाचं उड्डाण झाल्यानंतर दोन तासांनी विमानाचा संपर्क तुटला.

सुरुवातीला विमान व्हीएतनामच्या हवाई हद्दीत असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला.मात्र आता  हे विमान व्हीएतनामच्या समुद्रात कोसळल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.