सोशल मीडियावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
व्हाट्सऍपच्या एका क्रमांकावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले असून सदर कृत्य हे निंदनीय आहे. तसेच नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा संग्रामपूर तालुका माळी समाज आणि सावता परिषद यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबद्दलची तक्रार संग्रामपूरचे तहसीलदार आणि तामगाव पो.स्टे चे ठाणेदार बी.आर गीते यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आणि माळी समाजातील महिलांची टिंगल उडविण्यात आली. या गीतामुळे समाजातील महिलांचा व मुलींचा अपमान करण्याचे काम करण्यात आले असून या दोन्ही प्रकरणात संबंधित व्यक्तीवर आणि त्यांना मदत करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी साहेबराव बोदडे, गजानन ढोकणे, राम निमकर्डे, नारायण सावतकार, विनोद राजनकार, अनंता वानखडे, अनंत खिरोडकार, संदीप मानकर, आकाश मेहेत्रे, गणेश वानखडे, सुरेश सातव यांनी केली आहे.
तसेच एमएच २८.इन बुलडाणा सुद्धा या घटनेचा निषेध करीत आहे.
प्रतिनिधी: आकाश पालीवाल पातुर्डा