पद्मासन

Padmasana

आता पर्यंत आपण पाहले आहे अष्टांग योग, योगासन करण्या पूर्वी आवश्यक बाबी व अंगसंचालन. आज आपण पाहणार आहोत आसन. ज्या स्थिती मध्ये शरीर स्थिर व त्या स्थिती मध्ये मनाला सुख व शांतीची अनुभूती होते त्या स्थितीला आसन म्हटल्या जाते. आसन केल्याने शरीरातील नस-नाड्या शुद्धी होते त्या मुळे आपली तब्बेत चांगली राहते, तण व मन प्रसन्न राहते. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर शक्तिशाली व निरोगी बनते.

पद्म म्हणजे कमळ. या आसनामध्ये शरीराला कमळासारखा आकार प्राप्त होतो. त्यामुळे या आसनास पद्मासन म्हणतात. हे आसन ध्यान आणि जप करण्यासाठी केला जातो. हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. गौतम बुद्धांनी देखील ध्याना करता पद्मासन या आसनाचा वापर केला होता.

कृती :
सर्व प्रथम जमिनीवर बसून पाय लांब करून ताठ बसावं. नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. काहींना जर पहिले डावा पाय उजव्या पायाच्या माडीवर व उजवा पाय हा डाव्या पायाच्या माडीवर ठेवू शकता (जे सोपे जाईल तसे करा). नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांचे अंगठे तर्जनीच्या टोकाला लावावेत व हात गुडघ्यावर ठेवा. डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. पाठ आणि मान ताठ ठेवावी. डोळे बंद ठेवावेत.
आसनाची सुरुवात करताना प्रथम सुरुवातीस पाच मिनिटे या आसनात बसावं. या आसनात बसल्यास मनाला शांती मिळते. सुरुवातीस काही दिवस दोन ते तीन मिनिटं बसावं व हळूहळू वेळ वाढवावा.

अनुभव :
पद्मासन या आसनात बसल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. त्यामध्ये जर या परिस्थिती मध्ये आपण जर डोळे बंद केलेले असेल व मन एकाग्र असेल तर आपले मन हे अंगठा व तर्जनी जेथे स्पर्श करतात तेथे न्या. तुम्हाला येथे एक अनुभूती होईल हि अनुभूती प्रत्येकाची वेग वेगळी व सारखी देखील येऊ शकते. तुम्हाला असे जाणू शकते कि दोन्ही बोटे ऐक मेकाला ढकलत आहे, हुद्यावर हात ठेवल्या नंतर ज्या प्रमाणे ठोके जाणवतात तसे तुम्हाला येथे अनुभूती होईल तुम्हाला या व्यतिरिक्त हि अनुभव येऊ शकता.

घ्यावयाची काळजी :
सुरुवातीस हे आसन काहींना जमणार नाही. हे आसन करताना मांडया खूप दुखतील. तेव्हा या आसनात १० सेकंदच राहावं.
काहींचे जर पाय दुखत असतील तर हे आसन करूं नये.

फायदे :
या आसनामुळे शरीराचा लठ्ठ पणा कमी होते.
या आसनाचा उपयोग ध्यान, धारणा, प्राणायाम, जप आणि समाधीसाठी केला जातो.
या आसनामुळे दमा, निद्रानाश यासारखे रोग नाहीसे होऊ शकतात. ईतरही भरपूर फायदे या आसनाचे आपणास मिळतात.