"मृत्यु" काय असतो हा मृत्यु,

“मृत्यु” काय असतो हा मृत्यु,
ज्याचा जन्म झाला त्याचा अंत
की जन्माला आलेल्या जिवाचा शेवट
त्याची वाटणारी खंत

प्रत्येक जिवाला होणाऱ्या वेदना
आपणं सर्वजण पाहतो पण
त्या शेवटच्या क्षणी जेव्हा
तो जिवं जळतो त्यावेळी
कोण त्याच्याजवळ राहतो

जन्माला आलेल्या प्रत्येकाला
चुकलं नाही मरणं
नश्वर असलेल्या देहाचं
स्मशानात जान्या आधीचं
रचलेलं असतं सरणं

जन्माला आलेल्या जीवांचं,
आपण किती आनंदाने गुण-गाणं गातो,
हसता खेळता जीव का आपल्यातुन
हरवुन जातो

जन्म आणि मृत्यु हे, देवांनी लावलेलं झाड आहे
लहानाचं मोठं करून पुरविले
प्रत्येक जिवाचे लाड आहे
आणि त्याला जो आवडेल यांची
त्याच्या दरबारात असलेली वाढ आहे

आपल्या माणसांपासून दुर जावं,
असं कोणालाच वाटत नाही
आपलं माणुस नेतांना त्याच्या डोळ्यातं
अश्रू कधी दाटत नाही

जन्म आणि मृत्यु ह्या एकाचं
नाण्याच्या दोन बाजु
एकदाचं मिळतो मनुष्य देह
नका कुणी माजू…..
नका कुणी माजू…..
– सौ. अनिता भागवत येवले