व्हॉट्सअॅप च्या फालतू यूजर्स ला आता लगाम लागणार

whatsapp new feature

आता फालतुगिरी करणाऱ्या व्हॉट्सअॅप यूजर्स ला लगाम लावण्यात येणार आहे. हो, तुम्ही वाचताय ते बरोबर आहे. प्रत्येक ग्रुप किंवा फ्रेंडलिस्ट मध्ये काही ना काही जण असे असतात की जे नुसते इकडून तिकडे मेसेज फिरवत असतात. त्यांना आता लगाम लागणार असून. व्हाट्सअप च्या पुढच्या अपडेट मध्ये हे फिचर येणार आहे. “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल असा अंदाज आहे. यामध्ये अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो.

धार्मिक, जातीविषयक, कुणाची निंदा अथवा तेढ किंवा अश्लील मेसेज वारंवार एखाद्या ग्रुप मध्ये काही लोक पोस्ट करीत असतात. त्याचा इतरांना त्रास होतो की नाही याची पर्वा सुद्धा अशा व्यक्ती करीत नाहीत. तसेच काही व्हॉट्सअॅप यूजर्स आलेला मेसेज खरा आहे की खोटा याची खातरजमा न करता जसा आहे तसा आपल्या दुसऱ्याला फॉरवर्ड करणे आपले आद्यकर्तव्य समजून शेयर करीत असतात. यामुळे अनेकवेळा मनस्ताप तर काही ठिकाणी वाद सुद्धा झाल्याची उदाहरणे सुद्धा दिसून आली आहे. त्यामुळे अशा मेसेज ला आता आळा बसणार आहे. त्यामुळे तेच तेच गुड मॉर्निंग, गुड नाईट चे मेसेज बंद होऊ शकतील असं म्हणण्यास हरकत नाही. मात्र याची जबाबदारी सर्वथा ग्रुप ऍडमिन ची असणार आहे. व्हॉट्सअॅप आता “Restricted Groups” नावाचे फिचर घेऊन येत असून यामुळे ग्रूपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल. अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो. अशावेळी तो व्यक्ती ग्रूपमध्ये केवळ मेसेज वाचू शकतो. पण कोणत्याच मेसेजला रिप्लाय करु शकत नाही. बंदी घातलेल्या ग्रूपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.

WABetaInfo च्या माहितीनुसार, अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये हे फिचर समाविष्ट करण्यात येणार आहे. सोबतच ‘व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच’ हे फिच सुद्धा व्हॉट्सअॅप आणणार आहे. या फिचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल. तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. मात्र, यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी लागेल. विशेष म्हणजे या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंग फीचरही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.