विमानाचा रंग पांढराच का असतो ?

why aeroplane in white color

आपण नेहमी आकाशात पाहतो तर आपल्याला पांढऱ्या रंगाचे विमान दिसते. क्वचितच एखादे दुसरे वेगळ्या रंगाचे दिसते. ते सुद्धा पूर्ण रंगीत नसते तर काही ठिकाणी फक्त रंगीत पट्टे अथवा चित्र ई. दिसून येतात. तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का, विमानाचा रंग हा पांढराच का असतो ? तर चला जाणून घेऊया.

पांढरा रंग हा एव्हरग्रीन रंग आहे! म्हणजेच – बाकीचे रंग उन्हाने, पावसापाण्याने खराब होतात, फिके होतात पण पांढरा रंग जसाच्या तसा राहतो. एक तर विमान म्हणजे एखादी बस किंवा कार नाही की लांबी- रुंदी कमी आणि रंग देण्यास सुद्धा कमी पैसे लागतील. एका विमानाला रंगवण्याचा खर्च साधारण ५० हजार ते २ लाख डॉलर्स इतका होतो. चांगलं दिसलं तर ग्राहक वाढतील म्हणून रंग देणं योग्य वाटू शकतं पण त्यासाठी पैसा अधिक लागतो. त्यामुळे दिसायला बरं वाटेल एवढ्या भागात रंग दिल्या जातो आणि इतर पांढऱ्या भागावर फक्त पॉलिश दिलं जातं!

पांढरा रंग हा उष्णतेपासून रक्षण करतो. विज्ञान सांगतं – गडद रंग सूर्यप्रकाश जास्त शोषतात आणि त्यामुळे जास्त गरम होतात. विमान जेवढं तापेल, तेवढा त्या विमानाच्या AC चा खर्च वाढणार. पांढरा रंग बाकीच्या रंगांपेक्षा कमी उष्णता शोषतो आणि तुलनेने कमी गरम होतो.

पांढरा रंग हा लक्ष वेधून घेतो त्यामुळे जसा पांढऱ्या शर्टवर एखादा काळा डाग लगेच दिसून येतो तसेच पांढऱ्या background मुळे विमानावर oil leak, गंज पटकन ओळखता येतो. निळ्याशार आकाशात पांढरं विमान दिसून येतं, तसंच जमिनीवर सुद्धा विमान ओळखता येतं.

विमान घेताना ते फारच महागडं असत लाख दोन लाखात मिळणारी गोष्ट नसल्यामुळे जर तुम्ही विमान दुसऱ्या रंगात रंगवलं तर त्याची resale किंमत कमी होते. कारण विकत घेणाऱ्याला विमानाला परत रंग देत बसावं लागतं. त्यामुळे अशी गोष्ट कुणीच करीत नाही. याबरोबरच अनेक विमानं ही लीजवर घेतलेली असतात. बहुतेक विमान कंपन्या स्वतः विमान खरेदी करीत नाहीत. त्यांनी ते विमान-मालकाकडून लीज वर घेतलेले असते. समजा एखाद्या कंपनीची लीज संपली तर कंपनीचं नाव आणि लोगो काढून दुसऱ्या कंपनीचं लावायचं, बस! हे बदल करण्यासाठी पांढरा रंग वापरण्यात येतो.

तुमच्यासाठी विमानाला रंगरंगोटी करतानाचा एक छोटासा विडिओ आपल्या विडिओ कॅटेगरी मध्ये बघा.