काय सांगु बाई
या नवऱ्याची महती
फिरतो नेहमी माझ्या
सदा अवती भोवती.
गाऱ्हाने दुऱ्हाने
माझ्याजवळ सांगी
आलं भांडण अंगावर
करी पांगा – पांगी
कधी पाहता त्याच्याकडे
विचारात राही गुंगला
आपण म्हणता काय झाले
म्हणे तुझ्यात जीव रंगला.
मोबाईल आणि टिव्ही
झाल्या माझ्या सवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती भोवती
त्याच्या खट्याळ स्वभावाला
फुटली आता नवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती – भोवती.
सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)