वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

अचानक छातीत तीव्र वेदना होवून सुद्धा आपल्या प्रसंगावधानाने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची घटना व्याळा जवळ घडली. अकोला येथून बुलडाणा ही बस घेवून चालक यू. जी. रोम निघाले. मात्र थोड्याच वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या तरीही त्या परिस्थितीत गाडी सावकाश बाजूला घेवून त्यांनी गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र ते वाचू शकले नाहीत.

अकोला आगाराची एमएच-४0-५३९९ क्रमांकाची बस घेवून उत्तमराव गंगाधर रोम (रा. कौलखेड) हे बुलडाणा कडे निघाले असताना व्याळाजवळ त्यांना यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यांनी संयमाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली व प्रवाशांचे प्राण वाचविले; बसमध्ये ३0 प्रवासी होते. मात्र त्या नंतर दोन मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

एसटी कात टाकणार

Buldhana District official website

आपली सर्वांची आवडती एसटी आता कात बदलणार आहे. तसे संकेत महामंडळाकडून मिळाले आहेत. यात प्रामुख्याने गाडीच्या छतावर असलेला सामानाचा ‘डोलारा’ काढल्या जाणार आहे. एसटी च्या छतावर असलेले हे लगेज कॅरिअर काढून टाकणार आहेत.
याशिवाय सध्या गाड्यांची बांधणी करतांना वापरण्यात येणारे अ‍ॅल्युमिनियम ऐवजी ‘माइल्ड स्टील’चा वापर होणार आहे. चालकासाठी पंख्याची व्यवस्था. बसमध्ये पुढे आणि मागे असे दोन आपत्कालीन दरवाजे. गाडीत दोन अग्निशामक यंत्रे. बसमध्ये पाचऐवजी आठ ठिकाणी एलईडी दिवे. खिडक्यांचा आकारही मोठा होणार आहेत शिवाय सोबत मनोरंजनासाठी संगीत यंत्रणा बसवण्यात येणार असून गाडीला मागे आणि पुढे असे दोन्हीकडे फलक लागणार आहे. ही निश्चित चांगली बाब आहे. या सोबतच गाडीच्या टपावर असलेले लगेज कॅरिअर काढून टाकण्यात येणार असून ते इतरत्र हलविण्यात येणार आहे. वोल्वो अथवा इतर लक्जरी गाड्यांना ज्या प्रकारे दोन चाकामध्ये समान ठेवण्याची जागा असते त्या सारखी जागा यापुढे एसटी मध्ये दिसून येईल. मात्र यामुळे जागा कमी होणार असल्याने १२ ते १५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्नालाही महामंडळाला तोटा होणार आहे.