डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव पातुर्डा

ambedkar visit to buldana

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेल्या ग्राम पातुर्डाकडे अनेकांचे लक्ष नाही. शहरापासून दूर ग्रामीण भागात असलेल्या पातुर्डा गावास इतिहास लाभला आहे परंतु आज सर्व सुख सुविधा पासून गाव वंचित पडलेले आहे. गावास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून पावन झाले आहे.

पातुर्डा तसं मोठं गाव. शाळा, बाजार यांसह अनेक मंदिर, क्लासेस दिसून येतात. तसंच इतिहासकालीन अनेक स्थळ सुद्धा आपली साक्ष देत उभी आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर आहे. गावात गेल्यावर बाजारात एका ठिकाणी आपल्याला ती विहीर दिसून येते. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी ही विहीर खुली केली होती. त्यांनी स्वतः या विहिरीचे पाणी काढून अस्पृश्याना दिले होते. पातुर्डा येथे आले असताना येथील जि.प. मुलांची शाळा येथे त्यांचा मुक्काम होता यावेळी त्यांच्याकरीता अंघोळीसाठी एक पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. तो आता नाही आहे.

२५ मी १९२९ रोजी दोन दिवसीय अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब पातुर्डा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, रा. मकेसर , रा. केशवराव खंडारे , रा. संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. यावेळी असंख्य जनसमुदाय जमलं होता. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या आरंभी रा . बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला.

अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे, त्यांचा छळ करणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झाले होते. त्या अनुषंगाने आपल्या अस्पृश्य बंधूचे यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य पुढाऱ्यांनी ही परिषद बोलावली होती. या अधिवेशनात ९ ठराव पास करण्यात आले. त्यामध्ये जळगाव तालुक्यातील अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्यास उत्तेजन, नागपूर का,को मध्ये प्रतिनिधींची मागणी, चिखली येथील जुने चोखामेळा बोर्डिंग हणून पाडण्याचा प्रतिष्टीत ब्राम्हणांनी चालु केलेल्या प्रयत्नाचा निषेध व नवीन निघणाऱ्या बोर्डिंगास मदत न करण्याविषयी विनंती, सरकारी व एडेड हायस्कुल मध्ये बहिष्कृत वर्गाचे सर्रास फी घेण्याविषयी मागणी, कामगार महारास पोलीस अधिकाऱ्याकडून होणार त्रास नाहीसा करण्यासाठी विनंती, मेलेल्या जनावरांचे मास गावात न आणण्याविषयी कायद्याने बंदी करण्यास सरकारला विनंती, अस्पृश्य वर्गाने चालविलेल्या बोर्डिंगास दर विद्यार्थ्यामागे ५ रु. प्रमाणे मदत करण्याविषयी व नागपूरचे बोर्डिंग सर्वस्वी चालविण्याविषयी सरकारला विनंती, टाईम्स मध्ये अस्पृश्य परिषदेचे रा. एल. एस,. भटकर यांच्या निधनाची खोटी बातमी छापल्याने बातमीदाराचा निषेध आणि श्री. दाभाडे यांनी या परिषदेचा खर्च एकट्याने भरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे ठराव एकमताने पास करण्यात आलॆ.

अपघातग्रस्त मुलीसाठी मदतीचे आवाहन

accident victim yogita

पातुर्डा ता. शेगाव येथील योगिता गजानन झाडोकार हीचा अपघात झाला आहे. तिच्या मेंदूला मार लागल्याने तिच्यावर अकोला येथील विदर्भ क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची परिस्थिती सध्या नाजूक असून पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलविण्यात येणार आहे तिला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

कु. योगिता ही हिंगणा-मोरझोड रस्त्यावर मोटारसायकल वर जात असताना दुचाकीत दुपट्टा अडकल्याने अपघातग्रस्त झाली आहे. तिच्या मेंदूला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला येथील विदर्भ क्रिटिकल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

दानशूर व्यक्तींनी तिच्या उपचारासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अर्थसहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी गजानन रामकृष्ण झाडोकार यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पातुर्डा यांच्या खाते क्रंमांक : २९६९५४१४९० IFSC Code : २८१७२४ मध्ये आपली मदत राशी जमा करावी असे आवाहन झाडोकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

कु. योगिता ही बी ए च्या व्दितीय वर्षाला होती. येत्या १७ एप्रिल रोजी तिचे लग्न होणार होते. त्या निमित्ताने मामाच्या गावी जात असतांना हा प्रसंग घडला.

पातुर्डा येथे भरदिवसा चोरट्याचा डल्ला

नितीन खंडेराव, प्रतिनिधी: संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे आज दुपारी ३:३० श्री लतिश ज़ुम्बरलाल भूतड़ा यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातून १० हजार रुपायांची रोकड त्यांच्या घरातून लंपास केली. पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय जवळ श्री. भुतडा यांचे घर आहे. त्यांच्या घरी आज दुपारी अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून घरातील १० हजार रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनचे श्री. शेळके आणि साळवे हे तपास करीत आहे.