व्हॉट्सअॅप वर एकामागून एक येणारे मेसेज अनेकदा डोकेदुखी ठरते. अनेकदा तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा येतो . अनेक महाभाग मेसेज फॉरवर्ड करतांना कशाचा आणि कुणाचा आहे हे सुद्धा बघत नाही. त्यामुळे अनेक यूजर्स हास्याचं पात्र बनत असतात. परंतु आता याला लगाम लागणार आहे. इतरांचे मेसेज फॉरवर्ड करणं सुद्धा आता लपून राहणार नाही. कारण ‘Forwarded message’ हे नवीन फिचर व्हॉट्सअॅप मध्ये येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार आहे.
व्हॉट्सअॅपवर इतरांनी पाठवलेले मेसेज ग्रुप किंवा इतरांना फॉरवर्ड करण्याची जणू अनेकांना सवयच झाली आहे. सणासुदीच्या काळात तर व्हॉट्सअॅपवर Forwarded मेसेज पाठवून अनेकजण आपण किती सजग आणि शुभचिंतक आहोत हे दाखवून देत असतो . अनेक महाभाग तर हे फॉरवर्ड मेसेज आपल्या नावानं युद्ध खपवतात. अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅप ने वाईट बातमी आहे.
कारण यापुढे ‘Forwarded message’ हे नवीन व्हॉट्सअॅप फिचर सांगणार आहे की पाठवलेला मेसेज हा Forwarded आहे की नाही. या ‘Forwarded message’ च्या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. या मेसेजवर यापुढे ‘Forwarded message’ मेसेज असा टॅग येणार आहे. त्यामुळे कळेल की पाठवलेला मेसेज हा इतर ठिकाणाहून पुढे पाठविण्यात आला आहे. शिवाय व्हॉट्सअॅप ‘Group Description’ हे फीचर देखील पुढच्या अपडेट मध्ये मिळणार असून या फीचरमुळे व्हॉट्सअॅप ग्रुप बद्दल माहिती कळेल. ग्रुप ऍडमिन ग्रुप ची माहिती संबंधित ग्रुप मध्ये टाकू शकणार आहे.