Official website of Buldhana district

आपल बुलडाणा, आपली साइट

विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या व मां जिजाऊच्या माहेर असणार्‍या बुलडाण्याच्या एकमेव वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आम्ही ही साईट तमाम बुलडाणेकारांसाठी व वैदर्भिय जनतेसाठी तयार केली आहे. ही वेबसाइट म्हणजे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे. तुमच्या प्रश्नासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी तसेच इतर घडामोडी, नोकरी, आरोग्य, शिक्षण ई. माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा थोडा प्रयत्न करतोय.

एम एच २८. इन च्या नावाखाली तुम्हाला चांगली व तडक सेवा देण्याचा आमचा मानस असून आम्ही इंटरनेट, प्रिंटिंग, मोबाइल या क्षेत्रात काम करतोय. जिल्ह्याच्या व आसपासच्या सर्व क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक, विद्यार्थी, लेखक, नोकरदार वर्ग, गृहिणी ई. ना दोन पाउल पुढे नेण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करतोय. उद्या आपण सर्व हक्काने सांगू शकाल की, माझ बुलडाणा, माझी वेबसाइट असा आमचा प्रयत्न आहे.

आपल बुलडाणा, आपली साइट

बुलडाणा येथे ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा

Buldhana District official website

उद्या ८ मे रोजी बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण सभा बुलडाणा, ब्राम्हण युवक बहुउद्देशीय मंडळ बुलडाणा , पाराशर ब्राम्हण मंडळ बुलडाणा, भगवान परशुराम सेवा समिती (राजस्थानी ब्राम्हण) तसेच समस्त ब्राम्हण समाजातर्फे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मोटार सायकल रैली काढण्यात येणार आहे. कारंजा चौक येथील श्रीराम मंदिर येथून रैलीस सुरुवात होवून स्टेट बँक, जयस्तंभ चौक – जुनागाव – अडसूळ बंगला – मलकापूर बायपास – संगम चौक – विष्णुवाडी – चिखली रोड – ग्रीन नर्सरी जवळून परत तहसील चौक आणि परशुराम चौकात आरती व प्रसाद वाटपानंतर समाप्त होईल .

याशिवाय चैतन्यवाडी परशुराम चौकातून भव्य शोभायात्रेस सुरुवात होवून महाराणा प्रताप चौक – चिंचोले चौक – राधिका हॉटेल – शासकीय निवासस्थाना समोरून – परशुराम चौकात सांगता होईल. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवानी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आले आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला गारांचा तडाखा

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरूच आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्य़ांतील काही भागांना शनिवारी सलग सहाव्या दिवशी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले. विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्य़ाला, तर मराठवाडय़ातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागला.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्याला, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगावलाही शनिवारी गारपिटीने तडाखा दिला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ठिकठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारांमुळे किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा चिखल झाला. मराठवाडय़ातील परळीमध्ये अवकाळी पावसाने शनिवारी दोघांचा बळी घेतला, तर तालुक्यात २२ जण जखमी झाले.