बदकावरील झक्कास निबंध

एका मुलाचा बदकावर झक्कास निबंध

बदक लय चांगला असतो, तो पाण्यात चांगला दिसतो.
बदक मले खुप आवडतो. काऊन कि तो उल्साक असतो.
त्यो पाण्यात पवतो. मी भी पाण्यात पवतो.
मी रोज पाणी पितो, पाण्यानेच आंग धुतो.
बदक तर लय खेप आंग धुतो. त्याले कोणी हटकत नाय.
मीनं ले खेप आंग धुतलं त बोंबलते मायी माय.
आमचे मन्नू काका दारू पितात व गटाऱ्याच्या पाण्यात लोळतात.
पण बदक सफेद असतो म्हणून त्याले पाण्यात सोळतात
बदक सफेद असतो, दूध भी सफेद असते मी रोज दूध पितो.
मी चांगला दिसतो, बदक भी चांगले दिसते, बदक रोज पाणी पितो.
बदक पाण्यात तरंगतो, आबा जवळ काडी हाये,
काडी भी पाण्यात तरंगते. पण मी पाण्यात तरंगत नाई.
काडीने आबा बकऱ्या चारायले नेतात. जंगलातून काड्या घरी आणतात.
कधी मले त्याच आणलेल्या काडीने हाणतात.
हं आणखी कबुतर सफेद असते, ते माया घरावर येऊन बसते.
पण बदक माया घरी येत नाय काऊन कि त्याले पाण्याच्या बाहेर जा वाटत नाय. .
बदक लय दूर उडत नाय म्हणून ते माया घरी येत नाय.
ईमान भी हवेत उडत ते भी सफेद हाय.
बदक काया भी असतो त्यो पाण्याने आंग धूत नाय,
नुस्त पाण्यात पवते म्हणून त्यो काया हाय.
मले दोन पाय आहे बदकाले भी हाय.
मी दोन पायावर चालतो बदक भी दोन पायावर चालतो.
मले बदक लय आवळते काऊन कि तो लय सुंदर दिसतो.
झाला माया निबंध लिहून.