बदकावरील झक्कास निबंध

एका मुलाचा बदकावर झक्कास निबंध

बदक लय चांगला असतो, तो पाण्यात चांगला दिसतो.
बदक मले खुप आवडतो. काऊन कि तो उल्साक असतो.
त्यो पाण्यात पवतो. मी भी पाण्यात पवतो.
मी रोज पाणी पितो, पाण्यानेच आंग धुतो.
बदक तर लय खेप आंग धुतो. त्याले कोणी हटकत नाय.
मीनं ले खेप आंग धुतलं त बोंबलते मायी माय.
आमचे मन्नू काका दारू पितात व गटाऱ्याच्या पाण्यात लोळतात.
पण बदक सफेद असतो म्हणून त्याले पाण्यात सोळतात
बदक सफेद असतो, दूध भी सफेद असते मी रोज दूध पितो.
मी चांगला दिसतो, बदक भी चांगले दिसते, बदक रोज पाणी पितो.
बदक पाण्यात तरंगतो, आबा जवळ काडी हाये,
काडी भी पाण्यात तरंगते. पण मी पाण्यात तरंगत नाई.
काडीने आबा बकऱ्या चारायले नेतात. जंगलातून काड्या घरी आणतात.
कधी मले त्याच आणलेल्या काडीने हाणतात.
हं आणखी कबुतर सफेद असते, ते माया घरावर येऊन बसते.
पण बदक माया घरी येत नाय काऊन कि त्याले पाण्याच्या बाहेर जा वाटत नाय. .
बदक लय दूर उडत नाय म्हणून ते माया घरी येत नाय.
ईमान भी हवेत उडत ते भी सफेद हाय.
बदक काया भी असतो त्यो पाण्याने आंग धूत नाय,
नुस्त पाण्यात पवते म्हणून त्यो काया हाय.
मले दोन पाय आहे बदकाले भी हाय.
मी दोन पायावर चालतो बदक भी दोन पायावर चालतो.
मले बदक लय आवळते काऊन कि तो लय सुंदर दिसतो.
झाला माया निबंध लिहून.

खडूस डिग्याची फजिती

खडुस डिग्या नेहमी मुलांवर ओरडत असायचा. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.
एके दिवशी डिग्या डब्बूच्या घरी गेला.

खडुस डिग्या – डब्या पोरा मले लय जोराची तहान लागली आहे, जरा मले पाणी पाजत काय ??

डब्बू – पाणी तर नाही आहे माया घरी, नळ नाही आले. पण लस्सी आहे. चालेल काय …??

खडुस डिग्या (खुश होऊन) : वा वा चालेल की… हे त लयच मस्त जमलं !

डब्बू – लस्सी घेऊन येतो आणि डिग्या हावरटासारखा पाच लोटे लस्सी पितो.

खडुस डिग्या – डब्ब्या, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही काय रे…??

डब्बू – पितात तर, सर्वच जण पितात. पण आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.

खडुस डिग्या – संतापून…. हाता मधला लोटा जोरात जमीनीवर फेकून देतो.

डब्बू (रडत रडत) – मम्मी ह्या डिग्यानं आपला लोटा फोडला, आता आपुन Toilet ले काय घेऊन जायचं….??

खडुस डिग्या वर्षभरा पासून उलट्याच करत आहे. हा हा हा….

शेराले सव्वाशेर

आबा – अम्या, पिंट्या, रज्या मी जे इचारतो ते लक्ष देऊन ऐका .

पोर – लक्ष देऊनच ऐकत असतो आम्ही बोला तुम्ही.

आबा – पोर हो मले सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड ?

पोर (एका स्वरात) – लोखंड

आबा – दोघांचही वजन एक किलोच हाये त मंग लोखंड कसं जड होईन ?

अम्या – नाही आबा लोखंडंच जड हाये.

आबा (गोंधळलेल्या स्वरात) – अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहीन न.

पिंट्या – नाही आबा लोखंडंच जड राहीन

आबा (रागवून) – अरे लेकहो दोघायचही वजन सारखंच आहे.

रज्या (हसत हसत ) – तुम्ही मले एक किलो कापूस फेकून हाणा, मी तुमाले एक किलो लोखंड फेकून हाणतो.
मंग समझीन तुमाले काय जड हाये त.

आबा मंदातूनच उठले अन झाले बातच फरार….

अम्या, पिंट्या आणि रज्या हसुन हसुन बेजार… हा हा हा

 

काही तांत्रिक कारणामुळे एप मध्ये अडचण

buldana mobile application

सर्वाना सूचित करण्यात येते की, आपल्या एमएच २८.इन च्या सर्वर मध्ये काही काम चालू असल्याने वेबसाईट वर आणि एप वर काही अडचणी येत आहेत. तरी आपणा सर्वानाकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहोत. काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित तुम्हाला ‘अपडेट’ मिळत नसतील. तसेच आपल्याला मोबाईल\मध्ये “null rsponse” मेसेज मिळत असेल. काम चालू असल्याने अशी अडचण येऊ शकते. तात्पुरती खंडित झालेली सेवा पूर्ववत सुरु झाली असून काम प्रगतीपथावर आहे. तरी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. अधिक वेगवान आणि जलद सेवा देण्यासाठी एमएच २८ टीम कार्यरत असून त्यास थोडा कालावधी लागू शकतो.

धन्यवाद !
– टीम एमएच २८

ज्ञानदीप क्लासेस पातुर्डाचा अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बु. येथील “ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये गावातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरीक आणि ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्राम विकास असे उपक्रम राबवल्या जातात.

पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस चे ‘गजानन उगले’ आणि त्यांचा संघर्ष ग्रुपच्या वतीने गावात वृक्षारोपण, जल सिंचन, स्पर्धा परीक्षा, तसेच लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी यांचे ग्रुपचे सदस्य नितीन खंडेराव, आकाश पालेवार, राम वैद्य, श्रीकृष्ण आमझरे, विशाल खोंड, सचिन भट, लखन पवार, कुशल दवे, शंकर अढाऊ, संदीप तायडे इ. परिश्रम घेत आहेत. ‘ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी या विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट खात्यात काही रक्कम जमा करतात. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरज असलेल्या वस्तू उपलब्ध करून देतात. याशिवाय गावातील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत करणे. गावात स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, जल सिंचन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

“ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप सोबत तंटा मुक्ती आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असतात. एमएच २८. इन टीमने काल ग्राम पातुर्डा येथे भेट दिली असता ज्ञानदीप क्लासेस चे गजानन उगले यांनी स्वागत केले आणि आपल्या उपक्रम बद्दल माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, निटनेटकेपणा आणि तेथील वातावरण प्रशंसनीय होते.
आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या या नवयुवकांचे कार्य असेच उत्साहाने व अखंडपणे सुरु राहल्यास लवकरच या गावाचा कायापालट होणार यात तीळ मात्र शंका नाही. एमएच २८.इन तर्फे या सर्व नवयुवकांचे अभिनंदन तसेच यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

बुलडाणा येथे ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा

Buldhana District official website

उद्या ८ मे रोजी बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण सभा बुलडाणा, ब्राम्हण युवक बहुउद्देशीय मंडळ बुलडाणा , पाराशर ब्राम्हण मंडळ बुलडाणा, भगवान परशुराम सेवा समिती (राजस्थानी ब्राम्हण) तसेच समस्त ब्राम्हण समाजातर्फे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मोटार सायकल रैली काढण्यात येणार आहे. कारंजा चौक येथील श्रीराम मंदिर येथून रैलीस सुरुवात होवून स्टेट बँक, जयस्तंभ चौक – जुनागाव – अडसूळ बंगला – मलकापूर बायपास – संगम चौक – विष्णुवाडी – चिखली रोड – ग्रीन नर्सरी जवळून परत तहसील चौक आणि परशुराम चौकात आरती व प्रसाद वाटपानंतर समाप्त होईल .

याशिवाय चैतन्यवाडी परशुराम चौकातून भव्य शोभायात्रेस सुरुवात होवून महाराणा प्रताप चौक – चिंचोले चौक – राधिका हॉटेल – शासकीय निवासस्थाना समोरून – परशुराम चौकात सांगता होईल. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवानी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आले आहे.