आरोग्यवर्धक अद्रक

चहा प्यायला गेल्यावर साहजिकच प्रत्येकाच्या तोंडून निघते मस्त अद्रक टाकून चहा करा. म्हणजे चहाची चव या अद्रकामुळे वाढते. तसेच हा मसाल्यातील पदार्थ असून हा प्रत्येकाच्या घरात सहजच उपलब्ध असतो. पण हे अद्रक फक्तच चवीसाठी नाही वापरत तर याचा औषधी उपयोग सुद्धा आहे.  अद्रका मध्ये विविध गुण आहे तसेच याचे विविध उपयोग सुद्धा आहेत.अशा या अद्रकाचे दैनंदिन जीवनात फार मोलाचे योगदान आहे. चला तर मग आज आपण बघुयात या जमिनीच्या गाभाऱ्यात जन्मणाऱ्या अद्रकाचे उपयोग.

या अद्र्काला मुखवास म्हणून खाल्ल्या जाते हे पाचक असते.

उल्टी – या स्थिती मध्ये अद्रकाचा रस व कांद्याचा रस सारख्या प्रमाणात सेवन करावे.

घसा – आपला घसा थंडी मुळे अथवा थंड पेय पिल्या मुळे खराब झाला असेल तर अद्रकाचा रस व मध याचे सेवन दिवसातून २ – ३ वेळा करा.

भूख वाढवण्यासाठी – जेवणा पूर्वी मिठा सोबत अद्रक खा, किंवा सुंठ पावडर देखील जेवणा पूर्वी घेऊ शकता.

खोकला – खोकला झाल्यास घश्यात खवखव जाणवत असल्यास अद्रक खावा आराम वाटतो.

जखम – अद्रक पेस्ट करा जेथे जखम झाली आहे त्या भागावर जाडसर लेप लावा व त्यावर पट्टी बांधून ठेवा २ तासाने हा लेप काढून घ्या.
मुक्का मार लागलेला असेल तर या प्रक्रिये नंतर सरसोचे तेल लावा व त्या ठिकाणी सेक द्या आराम पडतो.

अपचन – जेवण झाल्या नंतर अद्रकाचा रस, निबू रस व सेंधेमीठ गरम पाण्यात टाकून प्यावे.

कान दुखी – अद्रकाचा रस थोडा गरम करा व कानात टाका.

नेत्र रोग– अद्रक जाळून त्याचे काजळ बनवा व त्याचा वापर काजळ म्हणून करा.

डोके दुखी – या मध्ये अद्रकाचा रस, सेंधेमीठ व हिंग यांच्या मिश्रणाने मालीश करावी.

औषध म्हणून अद्रकाचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

स्पेशल अद्रक वाली चाय

health benefits of tea

जर आपल्या दैनंदिन जीवनातून ‘चहा’ वजा केला तर ? अशक्य! ते होऊ शकत नाही असंच उत्तर मिळेल कारण चहा हा अविभाज्य घटक बनला आहे. चहा हे विष आहे जे हळूहळू मनुष्यास मारते असं कुणीही सांगत असलं तरी चहाचा घोट घेतल्याशिवाय सकाळ होत नाही आणि इतर मोठी कामे आणि चर्चासुद्धा चहाशिवाय पूर्ण होतंच नाही. हा चहा जर अद्रक टाकलेला असेल तर व्वा! त्याची मजा काही औरच !

अद्रकचा चहा अत्यंत गुणकारी आणि थंडीच्या दिवसात होणाऱ्या अनेक समस्यांचा नाश करतात.चहा चा फक्त सुगंध आपल्याला ताजेतवाने करतो. पचनक्रिया आणि तणावमुक्ती चहा उपयोगी ठरतो. यामध्ये असलेले एंटी ऑक्‍सीडेंट स्वास्थासाठी चांगले असतात. चला तर जाणून घेऊया चहाचे काही फायदे :
१. आळस आणि थकवा दूर करतो :
तुम्ही जर थकला आहेत आणि कंटाळा येत असेल तर त्यामधून बाहेर कडून स्फूर्ती देण्याचे काम चहा चा एक कप करतो. म्हणूनच ऑफिस, कचेऱ्या, हॉटेल आणि घरात आपल्याला चहा दिसतोच. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुद्धा विनाचहा होऊ शकत नाही.
२. उलटी व ओकारी वर गुणकारी :
प्रवासात अनेकांना उलटीचा त्रास होतो. त्यासाठी जर एक कप चहा पिऊन प्रवास करत असाल किंवा प्रवासात होणारी मळमळ आणि डोकेदुखी बंद करायची असेल तर अद्रकचा चहा उपयोगी ठरतो.
३. सर्दी पडसे दूर करतो
सर्दी पडसे ही अशी बिमारी आहे की लवकर जात नाही आणि मनुष्य खूप वैतागतो. जर सर्दी पडसे असेल तर अद्रकचा चहा त्यावर जालीम उपाय आहे. अद्रक मध्ये असलेले प्राकृतिक एंटीबायोटिक बंद झालेले नाक, कफ आणि डोकेदुखी बंद करण्यासाठी मदत करतात शिवाय गळा सुद्धा मोकळा होतो.
४. वात, पित्‍त आणि कफ दूर करतो
अद्रक चा चहा प्राशन केल्याने मनुष्याच्या वात, पित्‍त आणि कफ आणि त्यापासून होणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते
५. हृद्यरोगापासून बचाव करतो
अद्रक च्या चहात असेलेले अमीनो एसिड शरीरात रक्त प्रवाह संतुलित करण्यास मदत करतो. ज्यामुळे कार्डियोवास्कुलर, स्ट्रोक आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या दूर होतात. याशिवाय ब्लड सर्कुलेशन, श्वसन संबंधी समस्या, महिलांच्या मासिकचक्रात सुद्धा अद्रक चा चहा गुणकारी आहे. हे झाले आरोग्यवर्धक फायदे.
याशिवाय जीवनात सुद्धा अनेक महत्वपूर्ण घडामोडी चहा च्या साक्षीनेच पार पडतात. जस मुलगी बघण्याचा कार्यक्रम, लग्नसोहळा असो वा कार्यालयीन मिटिंग वगैरे. चला मग होऊन जाऊ द्या एक गरमा गरम ‘स्पेशल अद्रक वाली चाय’.