पित्यानेच केली सोनालिका ची हत्या

Buldhana

क्रूर पित्यानेच आपल्या ‘सोनालिका’ चा गळा चिरून हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील नांद्री येथे घडली. काल घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपीला जेरबंद केले आहे. खामगाव तालुक्यातील नांद्री येथील लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी लता हिचा विवाह सारोळा येथील लहू धंदरेसोबत मे २०१५ ला झाला होता. परंतु लहू हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता. तिचे सातत्याने माहेरी जाणे यामुळे तो लताचा शारीरिक मानसिक छळ करत होता. या त्रासामुळे लता ही मागील पाच ते सहा महिन्यांपासून नांद्री येथे आपल्या माहेरी आईवडिलाकडे राहू लागली. तिथेच लता ने एका मुलीस जन्म दिला. सर्वांनी ‘सोनालिका’ असे तिचे नाव ठेवले. मात्र कित्येक दिवस झाले पत्नी घरी येत नसल्याने संतप्त लहूने २६ एप्रिल रोजी माहेरी जावून २७ एप्रिलच्या पहाटे च्या सुमारास आईजवळ झोपलेल्या ‘सोनालिका’ चा घराजवळ काही अंतरावर नेवून गारगोटीने खून केला. ‘सोनालिका’ दिसत नसल्याने तिचा शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह शेतात आढळला. या प्रकरणी पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवीत अवघ्या ६ तासांत आरोपीस पकडले.

कॉम्पुटर कीबोर्डच्या F आणि J बटनाच्या खाली रेषा का असतात ?

Buldhana District official website

कॉम्पुटर कीबोर्डच्या F आणि J बटनाच्या खाली रेषा का असतात ? याचे उत्तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आपण रोज तासनतास कॉम्पुटर बसून असतो परन्तु कीबोर्डवर f आणि j बटनाच्या खाली मार्क असतो यामागे कुठलाही प्रोडक्शनची चूक नाही की त्यामुळे कुठलाही हेल्थ बेनेफिट नाही आहे. त्यामागेही कारण आहे. टायपिंगच्या नियमानुसार कीबोर्डवर हा मार्क देण्यात आलाय.

स्क्रीनवर बघून टाईप करत असताना टाईपिंगच्या नियमानुसार अंगठ्च्या बाजूचे बोट f आणि j या अक्षरावर असणे गरजेचे असते. तसेच इतर बोटे कीबोर्डवरच्या इतर अक्षरांवर असणे गरजेचे असते. त्यामुळेच योग्य प्रकारे टायपिंग करता यावे यासाठी या दोन्ही अक्षरांखाली हा मार्क असतो. जलदतेने व बिनचूक टायपिंग करण्यासाठी f आणि j बटनाच्या खाली मार्क दिलेले आहेत. टायपिंग करतांना आपल्या हाताची बोटे कुठल्या बटनावर असावी हे आपल्याला चित्रातून दिसून येईल. २३ एप्रिल २००२ रोजी जून बोटीक यांनी या बद्दलचे पेटंट दाखल केले होते. आणि त्यानंतर सर्व कीबोर्ड वर f आणि j बटनाच्या खाली रेषा दिल्या आहेत.

2000px-Typing-home-keys-hand-position.svg_

रिसोड जवळ इंडिका कारला अपघात , ७ ठार

Buldhana District official website

रिसोड जवळ इंडिका कारला अपघात, ७ ठार. रिसोड तालुक्यातील भर जहांगीर जवळ भरधाव वेगात असलेल्या इंडिका कारला भीषण अपघात झाला. या मध्ये ७ ठार झाले आहेत. काल रात्री रिसोड कडून भर जहांगीर कडे सदर इंडिका कार येत होती. गावाजवळील एका वळणावर चालकाचा इंडिका कारवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेल्या ७ जणांपैकी ६ जन जागीच ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेले ७ पैकी ५ जण हे लोणार येथील होते. मृत हे सर्व २०-२५ वयोगटातील होते.

उन्हाच्या झळा घोटती पक्ष्यांचा गळा

Sparrow drink water in Buldhana

वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे जिथे मनुष्यप्राण्याला पिण्याचे पाणी मिळत नाही, तिथे वन्यजीवांचे व पक्ष्यांचे काय? सततच्या दुष्काळामुळे व कमी पर्जन्यमानामुळे सार्वजनिक पाणवठे, तलाव, विहिरी तसेच एकूणच शहर व परिसरातील भूजलाची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. वाढते शहरीकरण व जंगलतोड व पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव व पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. उन्हाचा मोठा फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते व ते उडताना खाली पडतात,विद्युत तारांमध्ये अडकतात जखमी होऊन मृत्यु पावतात व अशा परिस्थितीत त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या घर अथवा इमारतीवर,झाडांवर पिण्याचे पाणी भांड्यामध्ये ठेवावीत. यामुळे पक्ष्यांना आधार मिळेल. ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे. तसेच या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात लावा. वास्तविक पाहता हीच खरी माणूसकी आहे.

Sachin A Billion Dreams चित्रपटाचा टीजर रिलीज

Sachin A Billion Dreams movie in Buldhana

Sachin A Billion Dreams चित्रपटाचा टीजर रिलीज

मुंबई ची प्रोडक्शन कंपनी 200 नॉट आउट आणि लंडन चे अवॉर्ड विनिंग राइटर, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर जेम्स एर्स्किन मिळून सचिन तेंडूलकर वर Sachin A Billion Dreams ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ह्या आधीच Sachin A Billion Dreams चित्रपटाचे दोन पोष्टर रिलीज करण्यात आले आहेत आणि आज खुद्द सचिननेच टीजर प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज ठीक १ वाजता टीजर करण्यात आला आहे. एकंदरीत टीजर वरून सचिनच्या जीवनातील प्रत्येक चढ उताराबद्दल चित्रपटात दाखवण्यात येणार आहे असे दिसून येते. सचिन शिवाय M.S. Dhoni आणि Azhar हे दोन चित्रपट सुद्धा येणार आहेत. क्रिकेट च्या मैदाना नंतर चित्रपट सृष्टि च्या मैदानावर कोण विजेता ठरते ते लवकरच कळेल.

पनामा पेपर्स : बच्चन सहित अनेकांचा पर्दाफाश

Panama Papers in Buldhana

पनामा पेपर्स (panama papers), हे नाव आजवर कुणाला माहिती नव्हत आणि बरेच लोकांना माहिती सुद्धा नाही. जगातील सर्वात मुख्य चर्चेचा विषय आहे म्हणजे पनामा पेपर्स. जगभरातल्या पत्रकारांनी मिळून काळा पैसा साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय त्याचे नाव म्हणजे पनामा पेपर्स. पनामा पेपर्स हे मधून जगातील अतिश्रीमंत, प्रतिष्ठीत, राजकारणी, कलाकार यांसारखे दिग्गज आपला पैसा परदेशी कसा पाठवत होते याचा खुलासा करण्यात आला आहे.

जगातील पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स हा समूहद्वारे ही बातमी उघड केली आहे. या समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस सुद्धा आहे. 11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर असतानाही काही देशांचे प्रमुखच आपल्याकडील अतिरिक्त पैसा विदेशात पाठवतात त्यामुळे त्यात काहीतरी काळ बेरं असतं. यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.

भारतातील बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा यामध्ये समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे.