गंगीचा उपचार

ghost story

झपाटलेली गंगीचा पुढील भाग

आणि आजोबा सुद्धा तिथे आले व त्यांनी सांगितले की बाळ्या…. ए … पोरा. हे अमानवीय दिसतया गड्या हा सगळा खेळ त्योच आहे… आणि ते घरात निघून गेले. मामा उठले आणि एवढ्या रात्रीच निघाले मामीने विचारले अव कुठी चालले इतक्या राती ? तर मामा काई बोलले नाई. आज्जी बोलली की जा बाळ्या यळ झाली आता त्या माय ले बोलवायची तेच लावीन आता एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष. मी तस आईला वीचारलं की आज्जी कुठल्या माय बद्दल बोलतेय. आईचा सुद्धा स्वर मंद झाला आई सुद्धा बोलली सोनू बाळा तू खरच यात पडू नकोस ती माय महाकालीची एकनिष्ठ भक्त आहे. तीला खूप काही समजते. मी लहान होती तेव्हा पासून तिला बघते एकदा आजोबांना भूत दिसलं होत तेव्हा घर गावात होत आणि आजोबा रात्री शेताहून पाणी देवून येत होते तेव्हा त्यांना नाल्यातून येताना एक माणूस भेटला होता आणि त्याने चक्क आजोबांना तंबाखू मागीतली होती आजोबांनी तंबाखू दिली तर त्याने ती घेतली आणि खाल्ली आणि आजोबांसोबत गप्पा करू लागला जेव्हा वेस जवळ आली तेव्हा तो बोलला की थांबा थोड मी पाणी पेतो मले तहान लागली आजोबांनी त्याला सांगीतले की एवढ्या रात्री कुठे दोर-बकेट शोधणार आणि पाणी काढणार…. घर जवळच आहे घरी चला चहा प्या, तसाच तो खीदी-खीदी हसायला लागला आणि त्याने आजोबांना वेसीजवळच्या वीहरीत ढकलले आणि झाडावर जाऊन बसला असे काहीतरी घडले होते तेव्हा आजोबा खूपच आजारी पडले होते काहीही केले तरी त्यांची तब्येत सुधारत नव्हती तेव्हा याच मायने त्यांचा उपचार केला होता.
ठीक आहे सोनु बाळा तू झोप आता रात्र फार झाली आहे. व आई झोपली पण मला कशाची झोप येते माझी उत्सुकता आणखी वाढली.आणि रात्र कल्पना करण्यातच गेली.
सकाळ झाली थोडा काळोखच होता मामा एका काळ्या कपड्यावाल्या बाईला घेऊन आले त्यांच्या गळ्यात काही वेगवेगळ्या मण्यांच्या माळा होत्या त्या काळोखात सुद्धा चमकत होत्या. हातात भारी वजनाची वाकडी तिकडी काडी होती. त्यांच्या खांद्यावर झोळी होती. मी दुरूनच हे सर्व पाहत होतो. मामा आले तसे घरातील सर्व तसे रात्रभर जागीच होते ते सर्व ओसरी मध्ये जमा झाले त्या मायने आजी-आजोबांना जय मा काली म्हटलं आणि ओसरीच्या बाहेरच उभी राहली आणि बोलू लागली हे जागा आवेशीत होयेल हाये….. आठीसाक काई असल्याचा मले भास हुन रायला…. . बाहीरच हाये बंद…. उपरी हवा वायते आठीसाक…. डाक… डाक…. डाक… डाकीण शाकिन काई बी असू शकते. लय बेक्कार हालत होयेल हाये ढोरायची. हूंम…. हुं…. नाय नाय अशी काही विचित्रच ती माय बोलत होती…. म्या काई वस्तू सांगते त्या आताच्या आता मायाजोळ आणून द्या अन आज्जी-आजोबा मामा सोडून बाकीचे बंदे घरात निगुन जा… आम्ही सर्व तीथून घरात गेलो मी खीडकीतून सर्व बघत होतो त्या माय ने एक ठिकाणी चार लिंबू ठेवले त्यावर काही तरी उच्चार करत ते घराच्या चारही कोपऱ्यात जमिनीत दाबायचे सांगीतले. मामाने तसे केले. मग त्यांनी काही लाकडे पेटवली व तिथे बसल्या आणि विस्तव तयार केला आणि तो विस्तवावर राय टाकली आणि धूप घेऊन फिरत असतानाच त्यांना चिंचेच्या झाडाखाली काहीतरी दिसलं आणि अचानक त्या झाडाखाली थांबल्या आणि मोठं-मोठ्याने ओरडू लागल्या बाळ्या….ओ….बाळ्या…. पोरा हे पाय रे…. तसे मामा तिकडे धावत गेले.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.