बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

अमरावती ते पुणे नवीन रेल्वे १ जुलै पासून ?

Buldhana District official website

अनेक प्रस्ताव आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अमरावतीकरांच्या सेवेत १ जुलै पासून पुण्यास जाण्यासाठी एक नवीन रेल्वेगाडी सुरु होणार आहे. तसे दाट संकेत मिळाले असून प्रस्तावित नव्या गाडीचे वेळापत्रक देखील इंटरनेटवर झळकू लागले आहे. ही गाडी सुरु झाल्यास अमरावती ते पुणे रेल्वे हे अंतर ७ तासांनी कमी होणार आहे.

सध्या अमरावतीहून पुण्यास जाण्यासाठी एकच गाडी असून लातूर मार्गे जाणारी ही गाडी १८ तास घेते. परंतु नवी गाडी सुरू झाल्यास अमरावतीहून पुण्याचा प्रवास सुमारे साडेअकरा तासात पूर्ण करता येणार आहे. या आधी अमरावतीहून मनमाडमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे त्यात लक्ष घालून होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यास आले असून अलीकडेच या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार आनंदराव अडसूळ, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनिल देशमुख व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अमरावतीहून पुण्यासाठी पनवेलमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यावर सकारात्मक विचार सुरू झाला.ही नवी रेल्वेगाडी पनवेलमार्गे सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. लवकरच या नव्या गाडीचा मुहूर्त ठरेल असे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र ह्या गाडीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही त्यामुळे रुळावरून ही गाडी केव्हा धावेल ह्याची सर्व जन आतुरतेने वाट बघत आहेत.

पुण्यात एलिअन

एकदा पुण्यात ‘लक्ष्मी रोडवर’ एक अवकाश यान येते.. आकाशातून मोठा लाईट मारुन एलिअन लोक घोषणा करतात..
” आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! ”
.
.
खालून गोखले आजोबा :
पर्किंग मिळते का ते बघ आधी..!!

पुण्यात स्फोट : घातपातचा संशय

पुण्यात स्फोट :
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामागे असेलेल्या फरास खाना पोलीस स्टेशन च्या आवराबाहेर स्फोट झाला आहे. आज दुपारी 2 वाजता झालेल्या ह्या स्फोटात स्फोटामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले असून काही दुचाकींचंही नुकसान झालं आहे. स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये पुणे पोलीस आयुक्तांसह वरीष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत.